अकोला जिल्ह्यात कृषी व्यावसायिकांचा बंद

गेल्या काही दिवसांपासून कृषी व्यावसायिक हे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी शासनाकडे रेटत आहेत.
Akola
AkolaAgrowon

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून कृषी व्यावसायिक (Agriculture Traders) हे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी शासनाकडे रेटत आहेत. या मागणीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. ९) जिल्हाभर कृषी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्‍ठाने बंद ठेवली. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा (Agriculture Inputs) मिळू शकल्या नाहीत.

Akola
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची बदली

जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी कृषी सचिव तसेच विभागीय कृषी सहसंचालकांना पत्र देत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांच्या बदलीची मागणी केली आहे. कृषी व्यवसायामध्ये वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप, कठोर कारवाईची धमकी, परवाना रद्द करणे अशा स्वरूपाचे गंभीर आरोप संघाने खोत यांच्यावर केले आहेत.

लहान गावांमध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप जाणवत आहे. अपमानास्पद व खालच्या पातळीवर बोलणे, छोट्या चुकांवर कठोर कारवाईच्या धमक्या देणे, ताकीद न देता सरळ परवाना रद्द करण्याच्या सूचना देणे, अशा कारवाया होत आहेत. अशा प्रकारांमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामुळे डॉ. खोत यांची बदली करावी, अशी मागणी व्यावसायिकांच्या संघाचे अध्यक्ष मोहन सोनोने यांनी केली आहे. बदलीची मागणी रेटण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी शनिवारी एकत्र येत बंद पाळला. या बंदमध्ये जिल्ह्यातील ४०० ते ५०० कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com