गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी जोरदार रस्सीखेच

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याच्या शिफारशी शिवाय निविष्ठा कंपन्यांना परवाना मिळू शकत नाही. त्यामुळे हे पद राज्याच्या कृषी विभागातील सर्वांत वजनदार पद समजले जाते.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

पुणे : कृषी आयुक्तालयातील (Commissionerate of Agriculture) मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Chief Quality Control Officer) सुनील बोरकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र बोरकर यांच्यानंतर रिक्त झालेले मलईदार पद मिळवण्यासाठी कृषी खात्यात (Department Of Agriculture) जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

Department Of Agriculture
Agriculture Department : एसएओ’ची संधी ८१ कृषी उपसंचालकांना मिळणार

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याच्या शिफारशी शिवाय निविष्ठा कंपन्यांना परवाना मिळू शकत नाही. त्यामुळे हे पद राज्याच्या कृषी विभागातील सर्वांत वजनदार पद समजले जाते. तत्कालीन कृषी संचालक विजयकुमार इंगळे यांच्या कालावधीत गुणनियंत्रण विभागातील अनेक घोटाळे बाहेर आले होते.

Department Of Agriculture
Agriculture Credit : बाजार समितीकडून शेतीमाल तारण कर्जासाठी १ कोटीची तरतूद

त्यामुळे पूर्वीचे अधिकारी सुभाष काटकर यांना गुणनियंत्रण विभागाचे प्रमुखपद सोडावे लागले होते. तेव्हापासून या पदासाठी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती. त्यात सतत दोन वर्षे प्रयत्न करणारे बोरकर या स्पर्धेत सरस ठरले.

गुणनियंत्रण विभागाची विस्कळित झालेली घडी मात्र बोरकर व तंत्र अधिकारी किरण जाधव यांनी नियोजनपूर्वक बसवली. विशेष म्हणजे बोरकर, जाधव यांच्यातील घट्ट समन्वयामुळे राज्यातील एकाही निविष्ठा कंपनीने गुणनियंत्रण विभागाच्या कामाबाबत तक्रार केल्याची घटना घडलेली नाही. बोरकर यांना आता कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाचे सहसंचालक पद देण्यात आले आहे.

समूह शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची बांधणी तसेच काटेकोर शेती हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. कोरोना कालावधीत राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांची विक्री आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यात गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी केलेल्या नियोजनात बोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com