Rural Development : हिवरेबाजारच्या विद्यार्थ्यांचे मंत्रालय परिसरात श्रमदान

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ रोजी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली होती.
Student Shramdan
Student ShramdanAgrowon

नगर ः महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ रोजी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी हिवरेबाजार मधील विद्यार्थ्यांना राजभवन (Raj Bhavan) भेटीचे आमंत्रणही दिले होते. त्यानुसार ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ६) राजभवनाला सदिच्छा भेट देऊन तेथील माहिती घेतली, तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. त्या वेळी येथील परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.

Student Shramdan
Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

या सहलीत हिवरे बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत माध्यमिक विद्यालयातील ११७ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजभवन पाहणी केली. सुमारे चार तास सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना राज्यभवनाचा ६५ एकरांचा परिसर राज्यपाल महोदयांच्या यंत्रणेने फिरून दाखवला.

या वेळी हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विमल ठाणगे व ग्रामस्थांनी राजयपालांना मानपत्र देऊन सन्मान केला. राजभवनाच्या पाहुणचारानंतर विद्यार्थी व ग्रामस्थांनी मंत्रालय परिसराची पाहणी केली. मंत्रालय परिसरातील प्लॅस्टिक कागद व इतर कचरा पाहिल्यावर, आदर्श गावात राहत असल्याने व नेहमीच्या सवयीप्रमाणे विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन श्रमदान करत मंत्रालयाचा परिसर स्वच्छ केला.

यात पद्मश्री पोपटराव पवार, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे यांच्यासह काही ग्रामस्थ सहभागी झाले होते. विद्यार्थांनी राजभवनाचा सर्व परिसर फिरून पाहिल्यानंतर राज्यपालांच्या वतीने सर्व विद्यार्थांना फराळ देऊन प्रत्येकाला पेन भेट दिला.

मंत्रालय परिसरात श्रमदान

राजभवनानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मंत्रालय प्रवेशद्वारा जवळ आले. परिसरातील प्लॅस्टिक, कागद, कचरा पाहून विद्यार्थ्यांनी मंत्रालय परिसर स्वच्छ केला. याच परिसरातील छोट्या बागेत सोबत आणलेल्या शिदोरीतून सर्वांनी भोजनाचा आनंदही घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com