Parbhani News: ‘हार्टफुल अॅग्रो यूथ समिट’साठी ‘वनमकृवि’तील विद्यार्थी रवाना

कार्यक्रमात देशातील साधारण ७५ कृषी व संलग्न विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी होतील. विद्यापीठाच्‍या संघात निवडक १४ विद्यार्थिनी आणि २८ विद्यार्थ्यांचा यांचा समावेश आहे.
Agricultural University Parbhani News
Agricultural University Parbhani NewsAgrowon

परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research) आणि हार्टफुल कॅम्पस यांच्यातील सामंजस्य करारानुसार हैदराबाद (Hyderabad) येथील कान्हा शांतीवनम येथे गुरुवार (ता.१२) ते शनिवार (ता.१४) दरम्यान आयोजित ‘हार्टफुल अॅग्रो यूथ समिट’मध्ये (Heartful Agro Youth Summit) सहभागी होण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्‍यांचा संघ बुधवारी (ता.१) रवाना झाला आहे.

या कार्यक्रमात देशातील साधारण ७५ कृषी व संलग्न विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी होतील. विद्यापीठाच्‍या संघात निवडक १४ विद्यार्थिनी आणि २८ विद्यार्थ्यांचा यांचा समावेश आहे.

‘यूथ समिट’मध्‍ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात उद्योग जगातील मान्यवरांशी संवाद साधला जाईल.

Agricultural University Parbhani News
Student : तुमच्याकडे नेमकी कोणती पिके घेतात, शेती करतात कशी?

कृषी क्षेत्रात होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या नवीन बदलावर चर्चा होईल. विद्यार्थ्‍यांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी योगा, खेळ, ज्ञानसाधना या कार्यक्रमावर अधिक भर यात राहील.

कृषी पद्धती, शेती, पृथ्वी यांच्याशी मानवाचे नाते आणि निसर्ग मानवासाठी देत असलेले दान याची जाणीव आजच्‍या तरुण पिढीमध्‍ये निर्माण करणे हा ‘हार्टफुल अॅग्रो यूथ समिट’चा उद्देश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com