Student Protest : विद्यार्थ्यांचा राज्यातील कृषी विद्यापीठांत ठिय्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.
Student Protest
Student ProtestAgrowon

नगर ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा (MPSC) मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.

मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering) शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे हजारो विद्यार्थी ठिय्या आंदोलन (Student Protest) करत आहेत. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

Student Protest
Farmer Protest : खंडित वीजप्रश्‍नी शेतकऱ्यांचा ‘ठिय्या’

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून ठिय्या धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Student Protest
Farmer Protest : पाण्यासाठी शेतकऱ्यांचे मुदाळतिट्टा येथे आंदोलन

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ४०० विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला आमदार नीलेश लंके यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश कृषी अभियांत्रिकी विद्यालये सध्या बंद आहेत.

मुख्यमंत्र्यासोबत बैठक घ्या

राज्यसेवा आयोगातर्फे कृषी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केल्याने कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.

भविष्यात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडण्याचा धोका आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.

त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यार्थ्यांतील प्रतिनिधींशी बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यसेवा आयोगाने चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना अंधारात ठेवले. कृषी सेवा परीक्षा अभ्यासक्रमात अचानक बदल केला. त्याचा थेट परिणाम यंदा विद्यार्थी संख्येवर झाला आहे.

कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ११४० असून, अवघे ४०७ प्रवेश झाले आहेत. भविष्यात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडण्याचा धोका आहे. मागण्या रास्त आहेत. त्यावर विचार व्हायला हवा.

- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com