
अंबाजोगाई, जि. बीड : ज्ञानाचा मार्ग हा कौशाल्यातूनच जातो. कौशल्य (Skill) प्राप्त केल्याशिवाय नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा (Book Knowledge) काहीही उपयोग नसून विद्यार्थ्यांनी विविध शेतीपूरक लघुउद्योग (Agri Business) केले पाहिजेत. त्यातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल व ते आत्मनिर्भर होतील. तसेच वाढती बेरोजगारी ही या माध्यमातून कमी होईल, असे मत ज्येष्ठ उद्योजक तथा निवृत्त अधीक्षक अभियंता नंदन पाठक यांनी व्यक्त केले.
शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पाठक बोलत होते. कार्यशाळा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपिन क्षीरसागर होते.
तर मंचावर खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, आणि कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभाग शास्त्रज्ञ रोहिणी भरड उपस्थित होत्या. डॉ. देवर्षी यांनीही विद्यार्थांना उद्योजकता विकास या बाबत मार्गदर्शन केले. रोहिणी भरड यांनी युवकांचा शेतीतील कल कमी होत असल्याचे सांगितले. प्रत्येक कृषी उत्पादनावर प्रक्रिया करूनच माल बाजारात नेला तर शेती नफ्याची होऊ शकते व युवक मोठा व्यवसाय ही उभा करू शकतात, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात बिपिन क्षीरसागर म्हणाले, एखाद्या व्यक्तीला जर उद्योजक व्हायचे असेल तर परिश्रम शिवाय पर्याय नाही. मात्र हे परिश्रम योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा वाघुले यांनी केले. तर प्रा. रोहिणी अंकुश यांनी आभार केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत रोहिणी भरड यांनी आवळ्याचे आहारातील महत्त्व या बद्दल माहिती दिली.त्याचबरोबर आवळा कँडी, मुरंबा, कुंदा, लोणची, लाडू शास्त्रीय पद्धतीने बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. याचबरोबर विद्यार्थ्यांना पॅकिंग, लेबलिंग, मार्केटिंग, वस्तूची किंमत काढणे याबद्दल सखोल माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपात विद्यार्थिनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.