Nachani Crop : झारखंडमधील नाचणीच्या क्रांतीचा ‘हार्वर्ड’मध्ये अभ्यास

एकेकाळी कमालीचे दारिद्र्य आणि नक्षलवादासाठी ओळखणाऱ्या जाणाऱ्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील नाचणीच्या क्रांतीची हार्वर्ड बिझनेस स्कूलनेही दखल घेतली आहे.
Nachani
NachaniAgrowon

Ranchi News : एकेकाळी कमालीचे दारिद्र्य आणि नक्षलवादासाठी ओळखणाऱ्या जाणाऱ्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील नाचणीच्या क्रांतीची हार्वर्ड बिझनेस स्कूलनेही दखल घेतली आहे. (Ragi Crop)

Nachani
Millet Sowing : खरिपात तृणधान्य पेरणीसाठी आतापासूनच विचार करा

गुमला पूर्व भारताची नाचणीची राजधानी झालेली पाहण्यास आवडेल, असे जिल्हाधिकारी सुशांत गौरव म्हणतात.

गौरव यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे महात्मा गांधी नॅशनल फेलो अविनाश कुमार यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये नाचणीची ही यशोगाथा सादर केली.

Nachani
Barnyard Millet : फक्त उपवासापुरतेच भगरीचे महत्व नाही

हार्वर्ड स्कूल नाचणीच्या गुमला मॉडेलचा अभ्यास करत असून इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनाही याची माहिती पाठविली जाईल.

तसेच अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीही हे मॉडेल वापरले जाईल. या कार्याबद्दल लोक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव यांना प्रदान करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com