Turmeric Processing : बसमतमधील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोलीत

बसमत येथील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोली कोकण कृषी विद्यापिठात सुरू करण्यात येणार आहे.
Turmeric Processing
Turmeric ProcessingAgrowon

Ratnagiri News : बसमत येथील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोली कोकण कृषी विद्यापिठात सुरू करण्यात येणार आहे. त्या भागातील हळदीपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील हळदीमध्ये अधिक गुणधर्म असल्याने हे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनलसाठी लागणाऱ्या २७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.

त्यासाठी ७० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी विमानतळासाठी गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.

Turmeric Processing
Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे..

२७ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले. त्यातील सुमारे ३०० लाभार्थ्यांना ७० कोटींच्या मोबदल्याचे वाटप झाले. संपादित केलेल्या जमिनीचा ताबा महाराष्ट्र एअरपोर्ट कार्पोरेशनकडे देण्यात आला आहे.

गुंठ्याला सुमारे ४० हजार रुपये भाव देण्यात आला. त्यामुळे भूसंपादाने ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. टर्मिनल बिल्डिंगसाठी हे महत्त्वाचे होते तसेच नाईट लॅंडिंगसाठी हिरवा कंदील दिला आहे,’’ असेही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.

Turmeric Processing
Turmeric Market : हळदीची ४५ ते ५५ लाख पोती विक्रीविना शिल्लक

शासनाच्या सलोखा योजनेतून जिल्ह्यातील जमीन अदलाबदल प्रकरणे करण्यात आली. दोन्ही खातेदारांच्या संमतीने हे केले जाते. याबाबत शासनाने शिर्डीमध्ये बैठक घेतली होती. जिल्ह्यातील या योजनेसाठी ८० शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यापैकी ४० शेतकऱ्यांचा जमीन आदलाबदलीची प्रक्रिया सुरू असून १० जणांची पूर्ण झाल्याने त्यांच्या नावे सात-बारा करून देण्यात आला. शासनाने या कामाबद्धल जिल्ह्याचे कौतुक केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com