Desi Cotton : सुभाष शर्मा यांचा देशी कापूस वाण लागवडीचा प्रयोग

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) विकसित केलेल्या ‘सुरक्षा’ या देशी वाणाची लागवड नैसर्गिक शेतीचा पॅटर्न राबविणाऱ्या सुभाष शर्मा यांनी केली आहे.
Desi Cotton
Desi CottonAgrowon

यवतमाळ ः केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) (CICR) विकसित केलेल्या ‘सुरक्षा’ या देशी वाणाची लागवड (Desi Cotton Cultivation) नैसर्गिक शेतीचा पॅटर्न (Natural Farming) राबविणाऱ्या सुभाष शर्मा (Subhash Sharma) यांनी केली आहे. त्यांना अर्धा एकरातून ८ क्‍विंटलची उत्पादकता होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या झाडाला असलेल्या बोंडांतील कापसाचे वजन करून हा अंदाज बांधण्यात आला आहे.

Desi Cotton
Colour Cotton : आले रंगीत कापसाचे वाण

मध्य भारताकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ‘सुरक्षा’ हे सरळ वाण शिफारशीत केले आहे. यात सरकीचे प्रमाण जास्त असून हे वाण लॉंग स्टेंपल वाण आहे. याची स्टेपल लेंथ ३२ असल्याचा दावा ‘सीआयसीआर’ने केला आहे. दरम्यान देशी वाणाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्ड संस्थेने पुढाकार घेतला आहे.

Desi Cotton
Cotton Rate : शेतकरी करताहेत कापसाचा साठा

त्या अंतर्गत ब्रीडर सीड (पायाभूत) देण्यात आले. ढगा (अकोट), अकोली जहांगीर येथे प्रत्येकी एक एकरात तर यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्या शेतावर अर्धा एकरावर या वाणाची लागवड केली आहे. सुभाष शर्मा यांनी तीन निंदण (१८०० रुपये), पेरणीचा यावर खर्च केला. सीतादहीच्यावेळी पहिल्या वेचणीतून ६४ किलो कापूस झाला.

Desi Cotton
Cotton Rate : कापसाच्या आवकेत ४४ टक्के घट

पाच बोंडाचे वजन केले असता (वरचे, मधले आणि खालचे) याप्रमाणे ५ ग्रॅम वजन भरले. एका झाडाला सरासरी ४२ बोंड निघाले त्यानंतरही १८ ते २१ पातोन (फुलाच्या नंतरची अवस्था) दिसून आली. लागवडीसाठी ४ फूट बाय दीड फूट असे अंतर ठेवण्यात आले. एकंदरीत अंदाज घेता अर्धा एकरातून ८ क्‍विंटलची उत्पादकता अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. देशी वाण लावताना काही नियम पाळावे लागतात. त्यानुसार आयसोलेशनचा नियम पाळण्यात आला असून लगत नॉन बिटीचा प्लॉट नको ही बाब गंभीरतेने घेण्यात आली.

लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया शेण, गोमूत्र, गूळ, माती याची करण्यात आली. पाऊस सरासरीपेक्षा दुप्पट पडला त्यानंतरही हा कापूस टिकून आहे. नैसर्गिक शेत प्रयोगांमुळे जमिनीत जिवाणूंची संख्या खूप वाढली आहे. सुरुवातीला अळीचा प्रादुर्भाव झाला होता; पण नैसर्गीक पद्धतीने मित्र किडीच्या माध्यमातून त्याचे नियंत्रण झाले. कोणतीच फवारणी करावी लागली नाही.

अलौकीक खत दोन ट्रॉली लागवडीच्यावेळी देण्यात आले (शेणखतापासून हे तयार होते एका ट्रॉलीसाठी चार किलो गूळ लागतो. शेणखताला पहिल्या दिवशी गुळाचे पाणी मारतो, ३० दिवसांनी पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते) पाच हजार रुपयांचा अलौकीक खतावर खर्च होतो. लागवड, २०० रुपये लागवड, जमीन तयार करणे १५०० रुपये, १३०० रुपये तण नियंत्रण असा एकूण खर्च यावर झाल्याचे शर्मा यांनी सांगितले.

‘कार्ड’ संस्थेच्या तज्ज्ञांनी पाहणी करून बोंडातील कापसाचे वजन केले. त्याआधारे अर्धा एकरातून आठ क्‍विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
सुभाष शर्मा, नैसर्गिक शेती अभ्यासक, यवतमाळ
देशी वाणांना प्रोत्साहन देत त्यामाध्यमातून बियाण्यांवरील खर्च कमी व्हावा असा उद्देश ठेवत शेतकऱ्यांना‘ सीआयसीआर’व्दारे संशोधित कापूस वाणाचा पुरवठा करण्यात आला.
विजय लाडोळे, कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी (कार्ड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com