Rabbi Season : रब्बी पिकांसाठी पाणी अर्ज सादर करा

बागाईतदारांनी आपले पाणी अर्ज संमतीपत्रकासह संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, शिरपूर कार्यालयात ३१ डिसेंबर जमा करावे.
 Rabbi season
Rabbi seasonAgrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
धुळे  : जिल्ह्यातील लघू पाटबंधारे योजना अभणपूर (ता. शिरपूर) अंतर्गत धरण, अधिसुचित नदी/ नाले याचा पाण्याचा फायदा देण्याचे नियोजित आहे. रब्बी हंगाम (Rabbi Season) २०२२-२३ मध्ये हंगामी पिकांना (Seasonal Crop) पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे. बागाईतदारांनी आपले पाणी अर्ज संमतीपत्रकासह संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, शिरपूर कार्यालयात ३१ डिसेंबर जमा करावे.

 Rabbi season
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागाईतदारांनी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाच्या मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणीपुरवठ्याबाबत अन्नधान्य/ भुसार/चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ
नये.

थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.  हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. असेही कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com