Crop Damage : शेतीपिकांच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे, शेतजमिनीचे नुकसान, घर पडझडीचे नुकसान, पशुधनाचे नुकसान या सर्व बाबींचा मागील आठवड्यातील व पुढील तीन-चार दिवसांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान होईल.
Crop Damag
Crop DamagAgrowon

सातारा : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान (Heavy Rain Damage) झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता (Heavy Rain Forecast) गृहीत धरून सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करून लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shmaburaj Desai) यांनी केले.

Crop Damag
Crop Damage : गणेशोत्सवात शहरात धामधूम, गावशिवारे सामसूम

जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. त्या वेळी देसाई बोलत होते. या वेळी आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे, शेतजमिनीचे नुकसान, घर पडझडीचे नुकसान, पशुधनाचे नुकसान या सर्व बाबींचा मागील आठवड्यातील व पुढील तीन-चार दिवसांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान होईल. त्याचा संबंधित विभागाने नुकसान भरपाईचा एकत्रित अहवाल लवकरात लवकर सादर करावा, म्हणजे निधीची तत्काळ तरतूद करता येईल. ज्या पाझर तलावांचे नुकसान झाले आहे, त्याचाही अहवाल सादर करावा. तसेच जे निकषात बसत नाही, परंतु नुकसान झाले आहे, असा प्रस्तावही विशेष बाब म्हणून सादर करावा.’’

‘‘रस्ते, वीज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासारख्या व अन्य सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचे परिपूर्ण प्रस्तावही सादर करण्यात यावेत. ज्या कुटुंबांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यांना प्रशासनाने तातडीची मदत देण्याची व्यवस्था करावी,’’ असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com