Crop Damage : नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरीव मदत करावी ः राजू शेट्टी

मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा परभणी ः अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत अत्यंत तुटपुंजी आहे. मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टीनंतर (Heavy Rain) पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. त्यानुसार शेतकऱ्यांना भरीव मदत करावी.

Crop Damage
Crop Damage:राज्यात पीक नुकसान १५ लाख हेक्टरच्या पुढे

विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई नाकारत असतील तर गंभीर बाब आहे. यात सरकारने लक्ष घालावे. मंत्र्यांनी हवाई दौरे सोडून शेत शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १३) येथे पत्रकार परिषेदत केली. शेट्टी म्हणाले, की मराठवाड्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. सर्वच मंडळांतील पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटांमुळे खरीप पिके हाती आली नाहीत. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. या परिस्थितीत शासकीय मदत तसेच सर्व विमाधारक शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालीच पाहिजे. विमाभरपाई नाकारून विमा कंपन्यांना मालामाल होत आहेत. शेतकरी कंगाल होत आहेत. दरवर्षी त्याच त्याच कंपन्यांची नियुक्ती केली जात आहे. पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे की कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी आहे. यातून सरकार आणि कंपन्यांचे लागेबांधे आहे की काय अशी शंका येते. सत्ताधारी तसेच विरोधकांचे शेतकरी तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नाही. त्यामुळे जनतेचा उद्रेक होईल. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगले दर मिळाल्यामुळे गतवर्षी साखर कारखानदारीत सुगीचा काळ होता. त्यामुळे कारखानदारांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देणे अपेक्षित होते. परंतु अजूनही राज्यातील २०० पैकी ९९ साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे. उसाची थकीत एफआरपी शेतकऱ्यांना अदा केल्याशिवाय यंदा राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू केले जाणार नाहीत, असेही शेट्टी यांनी सांगितले. या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हनुमंत राजेगोरे, रावसाहेब अडकिणे, केशव आरमळ, शेख जाफर आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com