Eknath Shinde Latest : गारपीट आणि पावसाने बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देणार

‘‘शेती पिकांचे गारपीट, पावसाने नुकसान झाले असल्यामुळे वाईट वाटते. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

Nagar News : ‘‘शेती पिकांचे गारपीट, पावसाने नुकसान (Crop Damage) झाले असल्यामुळे वाईट वाटते. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. शेतकरी असल्याने बांधावर येऊन आपल्याला भेटत आहे.

काळजी करू नका, भरीव मदत मिळेल,’’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गारपीटग्रस्तांना आश्‍वस्त केले. तसेच नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी (ता. ११) वनकुटे (ता. पारनेर) येथे गारपिट, पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वनकुटे येथे पाहणीनंतर गावांतील सभागृहात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

‘‘गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी चांगल्या प्रकारे पिके घेतात. आपल्या भागात गारपीट झाल्याचे कळताच लखनऊतूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे तातडीने काम सुरू झाले. तेथून आलो की लगेच बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतोय.

Eknath Shinde
Raju Shetti : 'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ' ; राजु शेट्टींची टीका

शेतकऱ्यांकडून अनेक बाबी समजून घेत आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांनाच कायम प्राधान्य दिले आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

‘एनडीआरएफ’चे नियम डावलून मदत दुप्पट देण्याचा निर्णय घेतला. मदतीसाठी दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. ज्याचे नुकसान झाले त्यांना कुठेही वंचित ठेवणार नाही.’’

या वेळी वनकुटे, पळशी, खडकवाडी व अन्य परिसरात गारपीट, पावसाने मोठे नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मागणी केली.

Eknath Shinde
Hailstorm Crop Damage : गारपीट, पावसामुळे ७२ तासांत ५० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

बाळासाहेब ठाकरे मुंबईचे रक्षक

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम परखड भूमिका घेतली. दंगलीत मुंबईचे रक्षण केले.

सावरकर, हिंदुत्व, देशरक्षणात त्यांची भूमिका कठोर होती. सध्याचे लोक मात्र ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, सावरकरांचा अपमान करतात त्यांच्या गळ्यात गळे घालतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

त्यांनी नैतिकता गमावली आहे. रामाशी आणि शेतकऱ्यांच्या घामाशी आमची श्रद्धा आहे. अयोध्येतील खर्चावर बोलण्यापेक्षा आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे यात विरोधकांनी राजकारण आणू नये, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये.

हा शेतकरी आमचा मायबाप, अन्नदाता आहे. कोण राजकारण करतेय हे लोकांना माहिती आहे. अयोध्येत शेतकऱ्यांसाठी सुखी दिवस मागितले. तेथून प्रेरणा, ऊर्जा घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com