Akola APMC Election : बाजार समित्यांवर प्रस्थापितांना वर्चस्व राखण्यात यश

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रीया राबवण्यात आली. २८ एप्रिलला झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडी तसेच भाजप-शिवसेना महायुती पुरस्कृत पॅनेल बहुतांश प्रमाणात विजयी झाले.
APMC Election Vidarbh
APMC Election VidarbhAgrowon

Akola Election Update : वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रीया राबवण्यात आली. २८ एप्रिलला झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडी तसेच भाजप-शिवसेना महायुती पुरस्कृत पॅनेल बहुतांश प्रमाणात विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीला सर्वत्र फारसे यश मिळू शकले नाही.

अकोट बाजार समितीत सहकारचाच दबदबा

जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लक्ष्यवेधी ठरली. चौरंगी लढतीत सहकार पॅनेलने मोठे यश मिळवले. १५ पैकी १५ उमेदवार विजयी झाल्याने या गटाने सहकार क्षेत्रावरील पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत सहकारसह शेतकरी, कास्तकार व जयकिसान असे चार पॅनेल रिंगणात होते.

APMC Election Vidarbh
APMC Election : संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता

बार्शीटाकळीत धाबेकर गटाची बाजी

बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुनील धाबेकर यांच्या मार्गदर्शनात शेतकरी संघर्ष पॅनेलने सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळवला.

या पॅनेलमध्ये आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे सदस्य आणि शिवसेनेचाही (ठाकरे गट) सहभाग होता. वंचित बहुजन आघाडीने शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या बाजार समितीमध्ये प्रवेश केला असून, त्यांचे तीन सदस्य निवडून आले आहेत.

बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील १८ जागांसाठी शनिवारी मतमोजणी झाली. त्यात शेतकरी संघर्ष पॅनेलने १८ पैकी १५ जागा जिंकल्या.

ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा वंचित बहुजन आघाडी प्रणीत शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या खात्यात गेल्यात. त्यात अशोक कोहोर, कल्पना नितीन जाधव, गोपाल कटाळे यांचा समावेश आहे.

शेतकरी संघर्ष पॅनेलसोबत असलेल्या शिवसेनेचे अशोक इंगळे आणि गंगाबाई सोनटक्के यांनी विजय मिळविला. भाजपचे अशोक राठोड, गोवर्धन सोनटक्के व महादेव काकड विजयी झाले. उर्वरित जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.

APMC Election Vidarbh
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

वाशीममध्ये कॉंग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनेलने रोवला झेंडा

वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास आघाडीने यश मिळवून बाजार समितीवर झेंडा फडकावला़.

या निवडणुकीत दुहेरी लढतीत शेतकरी सहकार पॅनेलला सहा जागांवर विजय मिळविता आला. शेतकरी विकास पॅनेलमध्ये निवडून आलेले बहुसंख्य संचालक माजी संचालक होते. अनुसूचित जमाती मतदार संघातून शेतकरी विकास पॅनेलचे सुभाष राठोड यांनी पहिला विजय मिळविला़.

त्यानंतर शेतकरी सहकार पॅनेलने दोन जागा जिंकून विजयाला सुरवात केली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी विकासाला ९ जागा तर शेतकरी सहकार पॅनेलला ६ जागा मिळाल्या.

तर मार्केट बचाव पॅनेलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या ११ जागांपैकी ८ जागेवर शेतकरी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये सर्वाधिक ७३४ मते घेत राजू चौधरी यांनी विजय मिळविला.

APMC Election Vidarbh
APMC Election Maharashtra : दुसऱ्या टप्प्यातही चुरशीने मतदान

या मतदारसंघात शेतकरी सहकार पॅनेलचे सुभाष चौधरी यांनी ५२२ मते घेत विजयश्री खेचून आणला. शिवाय सेवा सहकारी संस्था महिला प्रवर्गात शेतकरी विकासच्या सविता काटेकर,

शेतकरी सहकारच्या प्रमिला इढोळे, सेवा सहकारी संस्था राखीव विमुक्त जाती संघात शेतकरी विकासचे सुभाष राठोड तर सेवा सहकारी इमाव राखीव संघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी सहकाराच्या रेखा मापारी यांनी बाजी मारली.

सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी विकासचे चरण गोटे तर शेतकरी सहकाराच्या आशा मापारी, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक व अनुसूचित जाती मतदार संघात शेतकरी सहकारचे अनुक्रमे नंदकिशोर भोयर व विनोद पट्टेबहादूर हे उमेदवार विजयी झाले आहेत.

मानोरा बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता

मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने बाजार समितीवर एकहाती सत्ता काबीज करीत १५ संचालक विजयी झाले. तर भाजपा समर्थक शेतकरी आघाडीला २ तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास पॅनेलचे १८ पैकी १५ उमेदवार विजयी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com