Warna Dam : वारणा धरणग्रस्तांच्या वाट्याला दुःख आणि द्रारिद्र्य

चाळीस वर्षांपूर्वी वारणा धरणग्रस्तांनी घरदार सोडले. शासकीय यंत्रणेने रातोरात ट्रक भरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या लोकांना विस्थापित केले.
Warna Dam
Warna DamAgrowon

वाळवा, जि. सांगली ः सांगली जिल्ह्याच्या पश्चिम शिराळा तालुक्यातील चांदोली येथील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Warna Dam Catchment Area) असलेल्या गावांचे आणि लगतच्या अभयारण्य क्षेत्रातील (Sanctuary) बाधीत गावांचे १९८६ आणि १९९७ ला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत पुनर्वसन झाले; मात्र, आजही या लोकांचे शंभर टक्के न्याय आणि हक्काचे पुनर्वसन (Rehabilitation) झाले नाही.

परिणामी या लोकांच्या वाट्याला दुःख, दारिद्र्य आणि बेरोजगारी आली आहे. आता नव्याने या धरणग्रस्तांना संपादित केलेल्या जमिनीच्या सात-बारावरील कब्जेपट्टीच्या रकमेबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा म्हणजे धरणग्रस्तांच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची धरणग्रस्तांची भावना आहे.

चाळीस वर्षांपूर्वी वारणा धरणग्रस्तांनी घरदार सोडले. शासकीय यंत्रणेने रातोरात ट्रक भरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या लोकांना विस्थापित केले.

नैसर्गिक साधनसंपत्ती, घर, आंगण, झाडे, जमीन पाण्याखाली गेली आणि निसर्गाच्या सान्निध्यात पिढ्यानपिढ्या औषधाच्या एका गोळीशिवाय ठणठणीत आयुष्य जगलेले धरणग्रस्त परक्या मुलुखात निर्वासित झाले.

शासकीय उपकाराच्या भरोशावर असलेले हे लोक सध्या रोज एका बांधावर मजूर म्हणून काम करतात. या लोकांनी सर्वस्वाचा त्याग करून लाखो एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी विशेष भूमिका बजावली.

राज्य आणि राष्ट्राच्या विकासात धरणग्रस्तांएवढा त्याग कोणी केला नसेल. विस्थापित करताना घराला घर आणि फणाला फण देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

यावर विश्वास ठेवत धरणग्रस्तांनी मिळेल त्या ठिकाणी रहाणे मान्य केले. चाळीस वर्षे झाली आजही हे धरणग्रस्त शंभर टक्के पुनर्वसनासाठी शासकीय उंबरठे झिजवत आहेत. जमीन मिळाली पण रस्ता नाही.

Warna Dam
Agriculture MSP : योग्य हमीभाव देऊ; पण उत्पादन खर्च कमी करा

मिळालेली जमीन एकतर नापीक आहे किंवा पडीक आहे. कसदार पिकाऊ जमीन धरणाच्या पाण्यात बुडवून धरणग्रस्तांच्या वाट्याला सगळीकडे हलक्या जमिनी आल्या आहेत. अजूनही अनेक धरणग्रस्त पुनर्वसनापासून वंचित आहेत. रोज एका मागणीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो आहे.

शासकीय पातळीवर नोकरीसाठी आरक्षण स्थिर नाही. शाळा शिकून पुढे जायचे म्हटले तर मोलमजुरी करून ते शक्य होत नाही. मग पोरगा हाताखाली आला की त्याच्या हातात आपोआप खुरपे आणि खोरे येत आहे.

आपल्या गावात अतिशय संपन्न जीवन जगणाऱ्या या धरणग्रस्तांचे जथ्थेच्या जथ्थे रोज शेतमजुरीला जातात. ही वस्तुस्थिती आहे. या लोकांचे नैसर्गिक हक्काचे पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून कधी विधिमंडळात चर्चा झाली नाही.

Warna Dam
Warna Dam : वारणा धरणग्रस्तांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

दरम्यान, शासनाने या लोकांचे एका दमात शंभर टक्के पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न केला नाही. आता नव्याने या धरणग्रस्तांना संपादित केलेल्या जमिनीच्या सात-बारावरील कब्जेपट्टीच्या रकमेबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा पाच, दहा पंधरा, वीस, पन्नास लाख ते ऐंशी लाख रुपयांच्या घरात आहेत. या नोटिसा म्हणजे धरणग्रस्तांच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची धरणग्रस्तांची भावना आहे.

दृष्टिक्षेपात विस्थापन आणि पुनर्वसन.

* १९८६ ला वारणा धरणग्रस्तांचे तर १९९७ ला वारणा अभयारण्यग्रस्ताचे विस्थापन.

* सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत सुमारे तीन हजार कुटुंबे विस्थापित

* सांगली जिल्ह्यात २९ तर कोल्हापूर जिल्ह्यात २१ वसाहती.

* धरणग्रस्तांना २३० हेक्टर जमीनवाटप रखडले.

* अभयारण्यग्रस्तांना ४३२ हेक्टर जमीनवाटप रखडले.

* धरणग्रस्त खातेदारांचे संकलन रजिस्टर दुरुस्तीसाठी ६५० अर्ज शासकीय कार्यालयात प्रलंबित आहेत.

* भूखंडवाटप झाले नसून जमीन संपादनात अडथळे

* धरणग्रस्त वसाहतीत नागरी सुविधा पुरवण्याच्या कामात प्रत्यक्ष कोट्यवधी रुपये खर्च झाला नसून प्रत्यक्ष सुविधा नाहीत.

* खऱ्या धरणग्रस्तांना पुनर्वसनाचा फायदा न देता बोगस खातेदारांना प्रशासनाने प्राथमिकता दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com