Sugarcane Crushing Season : साखर आयुक्तांचा २२ कारखान्यांना दणका ; तब्बल १७६ कोटींचा ठोठावला दंडदंड

यंदाच्या ऊस गाळप हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी राज्यातील २२ कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करत दणका दिला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Sugarcane Crushing Season यंदाच्या ऊस गाळप हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी राज्यातील २२ कारखान्यांवर साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) कारवाई करत दणका दिला आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांना तब्बल १७६.५४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राज्य सरकारने २०२२-२३ ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांनी ठरल्यानुसार एफआरपीची रक्कम आणि अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याला गाळप परवाना देण्यात येणार नव्हता.

या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, असे असतानाही राज्य सरकारचा निर्णय झुगारून राज्यातील २२ कारखान्यांनी विनापरवाना गाळप केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२ कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Cultivation : पुणे विभागात ऊस क्षेत्रात ७० हजार हेक्टरने वाढ

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ कारखान्यांचा समावेश

एफआरपीची रक्कम आणि अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने गाळप सुरू करू नये, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घतलेला असातनाही राज्यातील २२ कारखान्यांनी गाळप सुरू केले. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Harvest Season In Marathwada : मराठवाड्यातील ६३ पैकी ४१ कारखान्यांचा हंगाम आटोपला

दंड करण्यात आलेले कारखाने

सोलापूर जिल्हा

  • आष्टी शुगर - एक कोटी १२ लाख ६७ हजार ५००.

  • सिद्धनाथ शुगर - सहा कोटी ५१ लाख ८७ हजार ५००.

  • ओंकार शुगर - ४१ लाख १४ हजार ५००.

  • मकाई - सात कोटी ९६ लाख ६७ हजार ५००.

  • मातोश्री लक्ष्मी शुगर - एक कोटी १६ लाख ५२ हजार ५००.

  • श्री शंकर सहकारी - एक कोटी ६१ लाख ४६ हजार ५००.

  • भीमा सहकारी - १३ कोटी ३ लाख ५५ हजार.

  • जकराया - १० कोटी ५७ लाख २० हजार.

पुणे जिल्हा

  • कर्मयोगी शंकरराव पाटील - १९ कोटी ६४ लाख ४५ हजार ५००.

  • नीराभीमा - तीन कोटी १६ लाख.

  • राजगड - दोन कोटी ६२ लाख ७५ हजार ५००.

धाराशिव जिल्हा

  • डीडीएनएसएफए - एक कोटी २७ लाख.

  • कंचेश्वर - तीन कोटी ६४ लाख ३० हजार.

जालना जिल्हा

  • श्रद्धा एनर्जी - १५ कोटी ९७ लाख ९५ हजार ५००.

  • रामेश्वर - पाच कोटी ५२ लाख ५० हजार.

  • समृद्धी शुगर्स - १४ कोटी ६४ लाख १८ हजार ५००.

Sugarcane Crushing Season
Rohit Pawar Latest News: रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला साखर आयुक्तांचा दणका

हिंगोली जिल्हा

  • टोकाई - पाच कोटी ४५ लाख २५ हजार.

कोल्हापूर जिल्हा

  • तात्यासाहेब कोरे - नऊ कोटी ६१ लाख ४५ हजार.

बीड जिल्हा

  • जयभवानी - दोन कोटी ४४ लाख ३० हजार ५००.

परभणी जिल्हा

  • बळिराजा -२५ कोटी ४ लाख ३५ हजार.

  • जळगाव जिल्हा

  • संत मुक्ताई - १५ कोटी ३ लाख ८५ हजार.

छत्रपती संभाजीनगर

  • घृणेश्वर - १० कोटी ४ लाख ५३ हजार.

रोहित पवारांच्या 'बारामती अॅग्रो'लाही दंड

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्यावर साखर आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू करण्याचे आदेश असतानाही मुदतीपूर्वी कारखान्याने गाळप सुरू केले होते.

अशी तक्रार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे करत चौकशीची मागणी केली होती. राम शिंदे यांच्या तक्रारीवरून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला साडेचार लाखांचा दंड करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com