Sugar Factory : साखर कारखान्यांना आता थकहमी नाही

तेरा कारखान्यांना ९६ कोटींची थकहमी जमा
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : भविष्यात कुठल्याही सरकारी साखर कारखान्यांना (Sugar Factory) शासकीय थकहमी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी १३ सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या थकहमीपोटी ९६ कोटी ५३ लाख रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

Sugar Factory
Sugar Factory : शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

आजारी सहकारी साखर कारखाने, संस्था यांच्याकडून कर्ज वसूलीसाठी त्यांच्या मालमत्तांची पुनर्रचना करून संवर्धन किंवा उचित विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रस्ताव महा-एआरसी लि. या कंपनीपुढे सादर करण्यात येईल. भविष्यात शासन थकहमीपोटी कोणत्याही सहकारी साखर कारखान्याला शासकीय हमी देणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला.

Sugar Factory
Sugar Factories: कारखान्यांची साखर निर्यातीसाठी लगबग; एफआरपीसाठी फायदा होणार का ? | ॲग्रोवन

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तीन कोटी रुपये, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २५ कोटी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६८ कोटी ४७ लाख रुपये अशी थकहमी होती. तत्कालीन प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. देवरा समितीने शिफारस केल्यानुसार पुढील अटी व शर्ती विचारात घेण्यात येतील. संबंधित बँकेने हमीपोटीची रक्कम मिळण्यासंदर्भात या कर्जाच्या वसुलीसाठी शासनाच्या विरोधात विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेले दावे, याचिका मागे घेण्यात याव्यात, भविष्यात याबाबत कोणताही वाद उपस्थित करणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र शासनास सादर करावे लागतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com