Sugar Mill : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साखर कारखाना कटिबद्ध

आमदार प्रकाश सोळंके : ऊस उत्पादक सभासद शेतकरी
Sugar Mill
Sugar MillAgrowon

सिरसाळा, जि. बीड : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना (Sundarrao Soluke Sugar Mill) कटिबद्ध असल्याचे सांगून या वर्षी उसाला प्रति टन २७०० तर पुढील वर्षी ३००० रुपये भाव देणार असल्याची ग्वाही देऊन, शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे शक्ती केंद्र अशी संस्था करणार असल्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solunke) यांनी दिली.

Sugar Mill
Sugar Mill : ऊसदर जाहीर करूनच कारखाने सुरू करा : सचिन नलवडे

सिरसाळा येथे नुकत्याच पार पडलेल्या ऊस उत्पादक सभासद शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक भागवत देशमुख, चेअरमन धैर्यशील सोळंके, बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, आश्रुबा काळे, प्रभाकर पोळ, शरद राडकर, प्रभाकर वाघमोडे, मोतीराम चोपडे आदींची उपस्थिती होती.

आमदार सोळंके म्हणाले, की शेतकऱ्यांनी उसाची नोंदणी वेळेवर करावी. दररोज ७ हजार प्रति टन गाळपक्षमता झाली असून, प्रत्येक दिवशी दीड लाख इथेनॉल निर्मिती होणार आहे. या वर्षी कारखान्याने १३ लाख टन उद्दिष्ट ठेवले आहे.

पाच कोटी इथेनॉलनिर्मिती, तर ७ कोटी ५० लाख रुपयांची वीज निर्मिती होणार आहे. यासोबत शेतकऱ्याला जास्तीचा दर देण्यात यावा यासाठी इंधन, चाळीस कोटीचा सीएनजी केमिकल प्रकल्प, तयार करून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.

तसेच सभासदांना १२ टक्के व्याजाने ठेवी उद्दिष्ट असून या माध्यमातून ५० कोटी रुपये रुपयाची गुंतवणूक वाढणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com