Sugar Industry: साखर कारखान्यांनी इथेनॉल, पोटॅश, हायड्रोजन निर्मितीकडे वळण्याची गरज

सा खर कारखान्यांनी आता केवळ साखरेवर लक्ष केंद्रित न करता इथेनॉलसह पोटॅश, सीबीजी, हरित हायड्रोजन यांसारख्या उपपदार्थ निर्मितीकडे वळण्याची गरज आहे,
Cooperative Conference
Cooperative Conference Agrowon

Sakal Cooperation conclave साखर कारखान्यांनी (Sugar Factory) आता केवळ साखरेवर लक्ष केंद्रित न करता इथेनॉलसह (Ethanol Production) पोटॅश, सीबीजी, हरित हायड्रोजन (Green Hydogen) यांसारख्या उपपदार्थ निर्मितीकडे वळण्याची गरज आहे, असे मत ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार महापरिषदेच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

‘साखर उत्पादनाच्या पलीकडे’ या विषयावर झालेल्या परिसंवादात प्राज इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक वैभव तिवारी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) वरिष्ठ शास्त्रज्ञ मोहन डोंगरे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक एस. डी. कोरडे सहभागी झाले होते. तर, सहवीज प्रकल्प तज्ज्ञ सुनील नातू यांनी परिसंवादाचे संचालन केले.

Cooperative Conference
Cooperative Conference : आगामी दशक सहकाराचेच

नातू म्हणाले, ‘‘साखर उद्योगात सहवीज निर्मितीला १९९५ पासून सुरवात झाली. त्यानंतर २०१० मध्ये इथेनॉल आणि बायो सीएनजी उत्पादन सुरू झाले. २०२४ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

२०३० पर्यंत ३० टक्के मिश्रण होणार आहे. एकूण १२०० कोटी लिटर्सपर्यंत इथेनॉल उत्पादनाचे ध्येय ठेवले गेले आहे. त्यामुळे सुमारे ३० हजार कोटी रुपयांची परकीय चलन वाचणार आहे.

१६ हजार मेगावॉट क्षमतेपैकी ५० टक्के क्षमतेने सहवीजेची निर्मिती राज्यात सुरू आहे. राज्यात १२३ कारखान्यांमध्ये त्यासाठी निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. ही क्षमता आणखी वाढू शकते.’’

Cooperative Conference
Cooperative Conference : उच्च उत्पादन क्षमतेकडे उसाची वाटचाल

तिवारी म्हणाले, ‘‘साखर उद्योगात बदल होत आहेत. आता इथेनॉलपर्यंत उद्योग पोहोचला आहे. जैव इंधनाच्या क्षेत्रातील संधीसाठी कारखान्यांनी तयारी करावी.’’

कोरडे म्हणाले, ‘‘कारखान्यांना सध्या सहवीज निर्मितीतून तयार होणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट ४.७५ पैसे मिळणारा दर किमान साडेपाच रुपयांपर्यंत मिळावा.``

साखर उद्योग हा कल्पवृक्ष आहे. इथेनॉल, सीबीजी, सहविजेसह पोटॅश निर्मिती ही साखर कारखान्यांच्या उत्पन्नासाठी अतिरिक्त स्रोत ठरू शकते. बाजारातील पोटॅशची किंमत विचारात घेतल्यास साडेचार हजार रुपये खर्च करावे लागतात. कच्चा माल साखर कारखान्यांकडे उपलब्ध असल्याने कमी दरात पोटॅश निर्मिती शक्य आहे. कारखान्यांनी पोटॅश निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यास आर्थिक लाभ होईल आणि शेतकऱ्यांनाही चांगले जैविक खत प्राप्त होईल.

-मोहन डोंगरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com