साखरनिर्मिती पोहचली एक कोटी क्विंटलवर

सातारा जिल्ह्यातील १३ साखर कारखान्याचा हंगाम सुरू, ९४ लाख टनाचे गाळप
Sugar Cane Production
Sugar Cane ProductionAgrowon

सातारा : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचे (sugar factories) ऊस गाळप सुरू आहे. सर्व कारखान्यांनी आतापर्यंत ९४ लाख ६७ हजार ३८६ टन उसाचे गाळप (Sugarcane flour) केले असून, त्यातून एक कोटी २० लाख ५ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी १०.७८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्याची साखरनिर्मितीत (Sugar Production) एक कोटी क्विंटलवर साखर निर्मिती टप्पा पार केला अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने मे महिन्यापर्यंत ऊस गाळप (Sugarcane flour) हंगाम सुरू राहणार आहे.

Sugar Cane Production
राज्यात ५५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

जिल्ह्यातील सहा सहकारी व सात खासगी कारखान्यांकडून (Factory) गाळप केले जात आहे. या गाळपात ‘जंरडेश्वर’ या कारखान्याने (Sugar Factory) आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक १५ लाख ५९ हजार २४० टन उसाचे गाळप (Sugarcane flour) केले असून, १७ लाख १९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ‘सह्याद्रीने साखर उताऱ्यात आघाडी मिळाली आहे. या कारखान्याने १२.५९ टक्के,

तर सर्वात कमी साखर उतारा’ श्री दत्त इंडिया'चा ९.०३ टक्के आहे.
जिल्ह्यात एकूण गाळपापैकी सहा सहकारी कारखान्यांनी ३९ लाख ४३ हजार ५ टन ऊस गाळप (Sugarcane flour) करून ४६ लाख २० हजार ६१० क्‍विंटल साखरनिर्मिती केली आहे. सात खासगी कारखान्यांनी ५५ लाख २४ हजार ३८१ टन ऊस गाळपाद्वारे ५५ लाख ८५ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. शिल्लक उसाच्या (Sugar Cane) क्षेत्राचा विचार करता कारखान्यांचा मे महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज आहे. या हंगामात साखर निर्मितीत एक कोटी क्विंटलचा टप्पा पार केला आहे. सर्व ऊस गाळप (Sugarcane flour) झाल्याशिवाय गाळप बंद न करण्याचा सूचना देण्यात आल्यामुळे या हंगामात सर्वाधिक साखर निर्मिती होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

तोडणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने, तसेच पाण्याची (Water) टंचाई भासू लागल्याने शेतकऱ्यांकडून (Farmer) लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी साखर कारखाने, तसेच चिटबॉयकडे चकरा घातल्या जात आहेत. या शेतकऱ्यांच्या (Farmer) असाहाय्यतेचा फायदा ऊसतोड (Sugarcane) मजुरांकडून घेतला जात आहे. या ऊसतोड मजुरांकडून एकरी चार ते पाच हजार रुपयांची मागणी केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com