Sugarcane Production : देशात सहा टक्के ऊस क्षेत्र वाढले

‘इस्मा’चा अंदाज; साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी शक्य
Sugarcane Area
Sugarcane AreaAgrowon


राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : देशात यंदा गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्के उसाचे क्षेत्र (Sugarcane Area) वाढले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानंतर सोमवारी (ता.१७) हा अंदाज जाहीर केला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानंतर हा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या नुसार यंदा ५९ लाख हेक्टर उसाची तोडणी अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ६ लाख हेक्टर क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध झाले होते.

Sugarcane Area
Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

सोमवारी देशभरातील विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, अभ्यासकांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये यंदाच्या ऊस हंगामावर, आव्हानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऊस क्षेत्राची प्रतिमा, अपेक्षित उत्पन्न, साखर वसुली, तोडणीची टक्केवारी, मागील व चालू वर्षातील पावसाचा परिणाम, जलाशयातील पाण्याची उपलब्धता, २०२२ च्या मॉन्सूनमधील पाऊस आणि इतर आनुषंगिक बाबींवर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्यात आला.

साखर ४५ लाख टनांनी घटण्याची शक्यता
उसाचा रस, बी-मोलासेस इथेनॉलकडे वळवल्यामुळे साखर उत्पादनात ४५ लाख टन घट होईल, असा अंदाज बैठकीत करण्यात आला. इथेनॉलकडे साखर वळवल्यानंतर साखरेचे प्रत्यक्ष उत्पादन ३६५ लाख टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Sugarcane Area
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?

१ ऑक्टोबर २०२२ रोजी सुमारे ५५ लाख टनांची साखर शिल्लक आहे. २०२२-२३ हंगामासाठी अंदाजे ३६५ लाख टन साखरेचे उत्पादन आणि अंदाजे २७५ लाख टनांच्या देशांतर्गत विक्रीमुळे सुमारे ९० लाख टन अतिरिक्त साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. अतिरिक्त साखरेचा बोजा पडू नये, या साठी जास्तीत जास्त निर्यात गरजेचे असल्याचे साखर उद्योगातील प्रतिनिधींनी सांगितले.

राज्य...ऊस क्षेत्र (२०२१-२२)...ऊस क्षेत्र (२२-२३) (लाख हेक्टर)...वाढ (टक्के)
उत्तर प्रदेश...२३.१...२३.८...३
महाराष्ट्र...१३.५...१४.५...७
कर्नाटक...५.९...६.५...११
तमिळनाडू...२.६...२.९...११
गुजरात...२.१...२.२...६
इतर...८.७...९.१...५
एकूण...५५.९...५९.०...६

अपेक्षित साखर उत्पादन (इथेनॉलकडे साखर वळवण्यापूर्वी)
राज्य... लाख टन
उत्तर प्रदेश...१२३
महाराष्ट्र...१५०
कर्नाटक...७०
तमिळनाडू...१४
गुजरात...१३
इतर...३४
एकूण...४१०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com