Sugarcane Crop : भाकसखेडा येथे ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक

भाकसखेडा ता. उदगीर येथे विलास सहकारी साखर कारखाना युनिट टू तोंडार यांच्या सौजन्याने बुधवारी (ता. २८) ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
Sugarcane Crop
Sugarcane Crop Agrowon

हेर, जि. लातूर ः भाकसखेडा ता. उदगीर येथे विलास सहकारी साखर कारखाना (Vilas Co operative Society) युनिट टू तोंडार यांच्या सौजन्याने बुधवारी (ता. २८) ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मंडळ अधिकारी पंडित जाधव (Pandit jadhav) यांच्या शेतातील ऊस पीक फवारणी (Sugarcane Crop Drone spraying) प्रात्यक्षिक करून दाखविले.

Sugarcane Crop
Crop Insurance : विमा कंपनीने फेटाळला अग्रिम रकमेचा दावा

विलास साखर कारखाना तोंडारच्यावतीने कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न कसे काढता येईल व शेतकऱ्यांना कमी मेहनतीचे जुगाड कसे परवडणारे होईल असा प्रयत्न चालू आहे. ऊसाला फवारणी करण्याची जोखमीची मेहनत असून यावर उपाय म्हणून ऊस पिकाला फवारणी करण्यासाठी ड्रोन सर्वात सोपा उपाय आहे.

Sugarcane Crop
Crop Loan : सीबिलमधून शेतीकर्जे वगळा ‘रयत क्रांती’ची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करुन मेहनतीत कपात करावी. यासाठी भाकसखेडा येथील शिवारात उसाला ड्रोनद्वारे कशी फवारणी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उसावरील लोकरी मावा व पांढरी माशी या कीटकांचा समूळ नाश करण्यासाठी या फवारणीचा उपयोग होणार आहे.

Sugarcane Crop
Crop Damage : जोरदार पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान

ड्रोन द्वारे जे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्या ड्रोनचे पायलट शैलेश साळवी, अभय जाधव, अनिकेत आवळेकर यांनी ऊस फवारणी कशी करावी हे समजावून सांगितले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. आर. पवार होते. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार,

संचालक पंडित नाना ढगे, युवराज जाधव, कार्यकारी संचालक अनंत बारबोले, अनिल पाटील, चेअरमन अशोक माने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन बिरादार, शेतकी अधिकारी पाटील, शशिकांत बुलबुले, शाखा तपासणीस अण्णासाहेब मुळे, पार्थ मुंडे, बालाजी कांबळे,

तुकाराम दंडे, गटसचिव दत्ता सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बिरादार, हंसराज मोमले, मंडळ अधिकारी पंडित जाधव, चेअरमन विवेक जाधव, उपसरपंच अरविंद मोरे, उपस्थित होते. यावेळी ड्रोनद्वारे फवारणी बाबत पार्थ मुंडे, ए.आर. पवार, कल्याण पाटील अनंत बारबोले यांनी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com