Sugarcane Season : तेरा कारखान्यांना गाळप परवाने

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड, विभागांतर्गगत चार जिल्ह्यांतून गाळप परवान्यासाठी ३० ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाले आहेत.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड, विभागांतर्गगत चार जिल्ह्यांतून गाळप परवान्यासाठी (Crushing licence) ३० ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी आजअखेर १३ कारखान्यांना राज्याच्या साखर आयुक्तांकडून (Sugar Commissioner) गाळप परवाना मिळाला आहे. गाळप हंगाम (sugarcane Season) तोंडावर आला असला, तरी इतर कारखान्यांना नियमाची पूर्तता केल्यानंतर गाळप परवाना देण्यात येणार असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

गाळप हंगाम २०२२-२३ साठी नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळपासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर केले आहेत. यात २१ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यंदा जिंतूर तालुक्यात (जि. परभणी) श्री तुळजा भवानी शुगर व शिवाजीराव पाटील निलंगेकर (जि. लातूर) या दोन कारखान्यांची भर पडल्याने यंदा एकूण ३० साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

Sugar Mill
Sugarcane Production : यंदा अतिरिक्त ऊस समस्या कशी टाळणार?

गाळपासाठी परभणी जिल्ह्यातील रेणका शुगर देवनंद्रा, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अमडापूर, योगेश्‍वरी शुगर लिंबा, गंगाखेड शुगर माकणी, ट्वेंटीवन शुगर सायखेडा, बळीराजा कानडखेड. श्री तुळजा भवानी, जिंतूर. हिंगोली जिल्ह्यांतून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, शिऊर साखर कारखाना वाकोडी. कपीश्‍वर शुगर अँड केमिकल लिमिटेड, जवळा बाजार.

Sugar Mill
Sugarcane FRP : एफआरपी पूर्ण न करताच मिळतोय गाळप परवाना

टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा. नांदेड जिल्ह्यातून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, सुभाष शुगर हडसणी, शिवाजी सर्व्हिस स्टेशन बार्‍हाळी, कुंटूरकर शुगर कुंटूर, व्यंकटेश्‍वरा ॲग्रो शुगर शिवणी. एमव्हीके ऍग्रो फूड प्रॉडक्ट, वाघलवाडा. तर लातूर जिल्ह्यातून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिंलोलीराव वाडी, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, विलास सहकारी साखर कारखाना तोंडार, रेणा सहकारी साखर कारखाना निवडा, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, सिद्धी शुगर उजना, जागृती शुगर तळेगाव, ट्वेंटीवन शुगर्स माळवटी.

पन्नगेश्‍वर शुगर मिल्स पानगाव, ता. रेणापूर, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुड, ता. ओसा व श्री साईबाबा शुगर लि. शिवणी, ता. ओसा, अशा तीस कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी १३ कारखान्यांना आजपर्यंत गाळप परवाना मिळाला आहे.

गाळप परवाना मिळालेले १३ कारखाने

श्री रेणुका शुगर लि. देवनंद्रा ता. पाथरी, योगेश्‍वरी शुगर इंडस्ट्रीज लि. लिंबा, ता. पाथरी, गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि., माखणी, ता. गंगाखेड, ट्वेंटीवन शुगर लि. उत्तमनगर, देवीनगर तांडा, सायखेडा, ता. सोनपेठ, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमतनगर, ता. वसमतनगर, शिऊर साखर कारखाना प्रा. लि, वाकोडी, ता कळमनुरी, श्री सुभाष शुगर प्रा. लि, हदगाव, ता. हदगाव, कुंटुरकर शुगर अँड अँग्रो प्रा. लि., कुंटुर, ता. नायगाव, व्यंकटेशरा ग्रो शुगर प्रॉडक्ट्‍स प्रा. लि., पो. शिवणी, ता. लोहा, विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार, ता. उदगीर, श्री. साईबाबा शुगर्स लि. शिवणी, ता. औसा, ट्वेंटीवन शुगर्स लि., माळवटी, ता. लातूर व तुळजाभवानी शुगर प्रा. लि., परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com