मराठवाड्यातील ऊसगाळप हंगाम संपला

कारखान्यांनी कळवले आता नाही शिल्लक ऊस
मराठवाड्यातील ऊसगाळप हंगाम संपला
Sugarcane CrushingAgrowon

औरंगाबाद : शिल्लक उसाचा (Excess Sugarcane) प्रश्‍न ऐरणीवर राहिलेल्या मराठवाड्यातील सर्वच कारखान्यांचा ऊसगाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) संपला आहे. यंदा जवळपास चार ते सहा महिन्यांपर्यंत व त्यापेक्षा जास्त काळापर्यंत काही कारखान्यांचे ऊस गाळप (Sugarcane Crushing) सुरू होते. शिल्लक उसाचे क्षेत्र (Sugarcane Acreage) असलेल्या कारखान्यांनीही आता कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक नसल्याचे कळविले असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा मराठवाड्यातील ५९ कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यामध्ये औरंगाबाद व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी ७, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी ६, लातूरमधील १०, उस्मानाबादमधील १४, हिंगोलीतील ५ व जालना जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यांचा समावेश होता. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात लातूर व जालना जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊसगाळप करणे थांबले.

सर्वच कारखान्यांचे ऊस गाळप थांबेपर्यंत मराठवाड्यातील ५९ कारखान्यांनी ३ कोटी २२ लाख ८२ हजार ७ टन उसाचे गाळप केले. तर ३ कोटी २२ लाख ४० हजार ८६३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. हे उत्पादन करत असताना औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांतील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा जास्त, तर बीड, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्क्यांच्या आत राहिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी २८ लाख ६७ हजार ३७ टन, जालना २८ लाख ९८ हजार ६६७ टन, बीड ४७ लाख १२ हजार ४२० टन, परभणी ४० लाख ५३ हजार ९१५ टन, हिंगोली २१ लाख ४८ हजार ४०७ टन, नांदेड २५ लाख ३० हजार ७०७ टन, उस्मानाबाद ७० लाख ९५ हजार ५३६ टन, तर लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ५९ लाख ७५ हजार ३१८ टन उसाचे गाळप केले.

३ कोटी २२ लाख क्विंटल साखर उत्पादित

औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २९ लाख ९० हजार ९९१ क्विंटल, जालना जिल्ह्यातील कारखान्यांनी ३० लाख ३८ हजार ३० क्विंटल, बीड ४० लाख ९५ हजार २२५ क्विंटल, परभणी ४२ लाख २० हजार २८८ क्विंटल, हिंगोली २२ लाख ६६ हजार २७० क्विंटल, नांदेड २४ लाख ७९ हजार ३५ क्विंटल, उस्मानाबाद ६७ लाख ९४ हजार ९६४ क्विंटल, तर लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ६३ लाख ५६ हजार ६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com