Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू झालेला गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे प्रवास करत आहे. वाढता उन्हाचा चटका यामुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

Sugarcane Crushing Season पुणे ः गेल्या पाच महिन्यांपासून सुरू झालेला गळीत हंगाम (Sugarcane Season) अंतिम टप्प्याकडे प्रवास करत आहे. वाढता उन्हाचा चटका यामुळे साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत हंगाम लवकर संपवू लागले आहे.

त्यातच वाढत असलेली पाणीटंचाईची (Water Shortage) वाढती तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची स्थिती बघता आतापासून साखर कारखाने बंद होत आहे.

सर्व साखर कारखान्यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी उसाच्या गाळप हंगाम सुरू केला होता. पुणे विभागातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला आहे.

सध्या विभागातील अनेक भागांत पाणीटंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे उसासह, सर्वच पिकांना पाण्याची फटका बसू लागला असून, कारखान्यांनाही ऊस मिळण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कारखान्यामध्ये सहकारी १८ व खासगी १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता एक लाख ६३ हजार ८०० टन एवढी आहे. विभागात आतापर्यंत ३१ कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले आहे.

Sugarcane Season
Sugarcane Crushing : सांगली जिल्ह्यात ६३ लाख टन उसाचे गाळप

आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये गुरू कमोडिटी सर्व्हिसेस या कारखान्याने गाळपात सर्वाधिक आघाडी घेतली. तर कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा ११.८२ टक्के एवढा साखर उतारा आहे.

अजून एक ते दीड महिना साखर कारखाने चालतील, अशी शक्यता आहे. मात्र विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पुणे जिल्ह्यात उसाचे प्रमाण बघता काही प्रमाणात उशिराने बंद होतील, असा अंदाज आहे.

गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात पावसामुळे साखर कारखान्याच्या गाळपात काहीशा अडचणी आल्या होत्या.

त्यानंतर गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले. पुणे विभागात सातारा, पुणे भागांत उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Sugarcane Season
Sugarcane Crushing : एक कोटी बारा लाख टन उसाचे नगर विभागात गाळप

गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.

शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निम्याहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे. अतिपावसामुळे उसाची पुरेशा प्रमाणात वाढ न झाल्यामुळे ऊसतोडणी वेगात सुरू आहे.

जिल्हानिहाय उसाचे गाळप (टनांत), साखर उत्पादन (क्विंटलमध्ये) :

जिल्हा --- कारखाने संख्या -- उसाचे गाळप -- साखर उत्पादन -- साखर उतारा (टक्के)

सातारा -- १४ -- ८२,२२,९०८ -- ८३,१५,०९५ -- १०.११

पुणे --- १७ -- १०८,५३,५६६ -- १०५,५८,५१३ -- ९.७३

एकूण --- ३१ -- १,९०,७६,४७४ -- १,८८,७३,६०८ -- ९.८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com