Sugarcane Season : सहा साखर कारखान्यांची धुराडी बंद

गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढल्याने साखर कारखान्यांने आपला गळीत हंगाम आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील सहा साखर कारखान्यांचा हंगाम आपोटला असून कारखाना स्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

Sugarcane Season पुणे ः गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढल्याने साखर कारखान्यांने (Sugar Mills) आपला गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) आटोपण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील सहा साखर कारखान्यांचा हंगाम (Sugar Season) आपोटला असून कारखाना स्थळी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

त्यामुळे तोडणी मजूर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. येत्या महिनाभरात उर्वरित साखर कारखाने बंद होतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली होती. यंदा सुमारे पाच महिने साखर कारखाने सुरू राहिले. पुणे विभागात हंगामात ३४ साखर कारखान्यांपैकी ३२ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच लगबग पहावयास मिळाली होती. किराणा दुकाने, हॉटेल यांचाही ऊस हंगामात तेजीत धंदा सुरू होता.

Sugar Mill
Sugarcane Labor Insurance : दहा लाख ऊसतोड कामगारांना पाच लाखांचे विमा संरक्षण

विभागात पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने १७ फेब्रुवारी, तर भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याने २५ फेब्रुवारी, अनुराज शुगर्स २७ फेब्रुवारी, साताऱ्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना ३ फेब्रुवारी, शरयु अॅग्रो ७ मार्च, खटाव माण तालुका अॅग्रोने १३ मार्च रोजी गळीत हंगाम बंद केला.

जिल्ह्यात अजूनही काही भागांत थोड्याफार प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे; मात्र, कारखान्यांनी गळीत हंगाम आपोटता घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात मे अखेरपर्यत गळीत हंगाम आटोपला जाण्याची शक्यता आहे. सध्या काही ठिकाणी कारखाने बंद झाले आहेत.

Sugar Mill
Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्र लवकरच अनुदान कक्षेत

यंदा उसाच्या गाळप हंगामासाठी विभागात एकूण सहकारी १९ व खासगी १३ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६७ हजार ३०० टन होती.

यंदा उसाची वाढलेली उपलब्धता लक्षात घेता उशिराने साखर कारखाने बंद होण्याचा अंदाज होता.

परंतु अति झालेल्या पावसाचा फटका उसाला बसल्याने ३ फेब्रुवारीपासून कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे.

त्यामुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपवण्याचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत बंद झालेल्या कारखान्यांमध्ये पुण्यातील तीन, साताऱ्यातील तीन कारखान्यांचा समावेश आहेत, असे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात

आतापर्यंत पुणे विभागात झालेले ऊसाचे गाळप :

एकूण सुरू झालेले साखर कारखाने -- ३२

दैनंदिन गाळप क्षमता, टन -- १,६७,३००

एकूण ऊस गाळप, टन -- २,१५,०१,६६८

साखर उत्पादन, क्विटंल -- २,१५,४७,३२८

सरासरी साखर उतारा, टक्के -- १०.०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com