Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ६४ हजार हेक्टरवर उस लागवड

नांदेड विभागात गाळप हंगाम २०२२-२०२३ मध्ये वीस साखर कारखाने सुरू होणार आहेत. यात २० खासगी तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

नांदेड : नांदेड विभागात गाळप हंगाम (Nanded Sugarcane Season) २०२२-२०२३ मध्ये वीस साखर कारखाने (Sugar Mills) सुरू होणार आहेत. यात २० खासगी तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यासाठी चार जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ६८० हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार असल्याची माहिती नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

Sugarcane
Sugarcane Verity : कोकणात उसाच्या दोन जाती ठरल्या सरस

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात गाळप हंगाम २०२२-२०२३ मध्ये नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३० कारखाने यंदा सुरू झाले आहेत. यात २० खासगी तर दहा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. विभागात २५ आक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू झाला आहे.

विभागात यंदा गाळपासाठी कारखान्यांकडे दोन लाख ६८ हजार २५० हेक्टर क्षेत्राची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. तर कृषी विभागाने एक लाख ४२ हजार ६०१ हेक्टरवर ऊस लागवडीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कृषी विभाग आणि साखर सहसंचालक कार्यालयाने संयुक्तरित्या एक लाख ६३ हजार ६८० हेक्टरवर ऊस लागवड निश्‍चित केली आहे.

जिल्हानियाह ऊस लागवड हेक्टरमध्ये जिल्हा कृषीचा अंदाज

कारखान्याकडील नोंद संयुक्तिक नोंद

नांदेड ३६,२३६ ४३,५५० ३५,९४३

हिंगोली १२,९०८ ४०,६७९ १७,५२०

परभणी ३५,८३७ ६५,५७० ४७,०५८

लातुर ५७,६१८ १,१८,२७१ ६३,१५७

एकूण १,४२,६०१ २,६८,२५० १,६३,६८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com