
जळकोट ः तालुक्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तब्बल ११०० हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्यात आली आहे.
जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात होता. उसाचे एखादे टिपरू आणायचे म्हणजे फरकटत फिरावे लागत होते. कै.चंद्रशेखर भोसले, माजी आमदार मनोहर पटवारी (Former MLA Manohar Patwari), आमदार संजय बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील बारा साठवण तलाव व शंभरहून अधिक पाझर तलाव झाले.
त्यामुळे सिंचनाचे (irrigation) प्रमाण वाढले एकेकाळी तालुक्यात शंभर हेक्टरवर ऊस नव्हता आता पाणी उपलब्ध असल्यामुळे आकराशे हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे.
तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर विकास टु, कारखाना चालु झाला. ऊस वेळेवर जाण्याची सोय उपलब्ध झाली. उसाला चांगला भाव मिळू लागला त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकरी उत्साहात वळला.
दरम्यान तालुक्यात माळहिप्परगा, रावणकोळा, चेरा, जंगमवाडी, सोनवळा, डोंगरगाव आदींसह बारा साठवण तलाव उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे साठवण तलावाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुले ऊस क्षेत्र वाढले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.