Sugarcane : ऊस शेती प्रशिक्षणाला ५ जुलैपासून सुरवात

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) राज्यव्यापी ऊस शेती ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरांना पाच जुलैपासून सुरवात होत आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

पुणे (प्रतिनिधी) : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) (व्हीएसआय) राज्यव्यापी ऊस शेती ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरांना पाच (Sugarcane Farming Training) जुलैपासून सुरवात होत आहे. ऊस व साखर उत्पादकता वाढविण्यासाठी पुरुष शेतक-यांसाठी ‘ज्ञानयाग’ तसेच महिलांसाठी ‘ज्ञानलक्ष्मी’ असे निवासी प्रशिक्षण उपक्रम गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. महिला शेतक-यांसाठी प्रशिक्षण ५ ते ८ जुलै दरम्यान राहील, असे व्हीएसआयचे विशेष कार्य अधिकारी संभाजी कडू पाटील यांनी कळविले आहे.

Sugarcane
Sugarcane : एकरी १०० टन ऊस उत्पादन मोहिमेत सहभागी व्हावे

१२ ते २५ जुलै दरम्यान विदर्भ व कोल्हापूरमधील पुरुष शेतक-यांसाठी ज्ञानयाग असेल. १९ ते २२ जुलै सांगली,सातारा तर २६ ते २९ जुलै दरम्यान पुणे, नगर, नाशिकसाठी ज्ञानयाग होईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान सोलापूर, मराठवाडा व खानदेशातील शेतकऱ्यांसाठी ज्ञानयाग भरविला जाईल.

या उपक्रमातून राज्यातील शेतक-यांना ऊसशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासहीत मिळणार आहे. त्याकरिता तीन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले जाते. शेतकऱ्यांनी या उपक्रमाच्या माहितीसाठी www.vsisugar.com या संकेतस्थळावर किंवा 020-26902268 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कडू पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com