Sugarcane Harvest : पावसाने कारखान्यांची ऊसतोडणी लांबणीवर

सातत्याने होणाऱ्या पावसामुळे बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसतोडणीचा कार्यक्रम लांबणीवर टाकला आहे. अनेक कारखान्यांनी गळीत हंगामाचे मुहूर्तही पुढे ढकलले आहेत.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

कोल्हापूर : सातत्याने होणाऱ्या पावसामुळे (Rainfall) बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसतोडणीचा (Sugarcane Harvesting) कार्यक्रम लांबणीवर टाकला आहे. अनेक कारखान्यांनी गळीत हंगामाचे (Sugarcane Season) मुहूर्तही पुढे ढकलले आहेत. पंधरवड्यापूर्वी अनेक कारखान्यांनी दिवाळीच्या अगोदरच्या सप्ताहामध्ये मुदत करून गळितास प्रारंभ करण्याची ठरवले होते.

Sugarcane Harvesting
Sugarcane In Kokan : कोकणात ऊस लागवड करणं फायदेशीर ठरेल का ?

सलग पडणाऱ्या पावसामुळे कारखाना व्यवस्थापनाला तोडणीचे फेरनियोजन करण्यास भाग पाडले आहे. पंधरा तारखेपासून कारखान्यांनी तोडणीचे नियोजन केले होते. पण दररोज पडणारा पाऊस तोडणी सुरू करण्यास अडचण निर्माण करत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सर्वच साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचे नियोजन पुढे ढकलले आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Labors : नरसिंहपूर परिसरात ऊसतोड मजुरांच्या राहुट्यांत पाणी

दिवाळीपर्यंत पाऊस न थांबल्यास दिवाळीनंतरच हंगामास सुरुवात होईल, असे कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. बहुतांशी कारखान्यांचे ऊसतोडणी कामगार नियोजित ठिकाणी दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. कामगार येण्याची गती कमी असली तरी आलेले कामगार तोडणीच्या ठिकाणी थांबून आहेत.

Sugarcane Harvesting
Sugarcane Labors : कारखाने सुरू, मात्र ऊसतोडणीला अडथळा

पाऊस असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांशी कारखानदार रस्त्याकडेला असणाऱ्या उसाची तोड करण्यास प्राधान्य देतात. यंदा मात्र असे वेळापत्रक करण्यास पावसाने उसंतच दिली नसल्याचे चित्र आहे. जरी सकाळी पुढील दोन दिवसांचे ऊस तोडणीचे नियोजन एखाद्या ऊस प्लॉटचे केले तर संध्याकाळी पडणारा पाऊस हे नियोजन पुढे ढकलण्यास भाग पाडत आहे. यामुळे काही कारखान्यांची मुहूर्त ही थांबले आहेत. मुहूर्त केल्यास अखंडित गाळप करावे लागते. यासाठी सलग उसाची तोड होणे गरजेचे असते.

सध्या ऊस पट्ट्यात पडणारा पाऊस गाळपाला विलंब करत आहे जोपर्यंत तीन ते चार दिवस सलग ऊन पडणार नाही तोपर्यंत उसाची तोडणी करणे शक्य नसल्याचे कारखान्याच्या शेती विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. सध्या पाऊस थांबल्यास मात्र पहिल्या टप्प्यात केवळ माळारानावरचीच ऊस तोडणी शक्य आहे. दररोज पाऊस धुमाकूळ घालत असल्याने कारखान्याच्या शेती विभागाच्या प्रतिनिधींना आता ऊसतोड मजुरांची व्यवस्थापनाकडेच लक्ष द्यावे लागत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com