Sugarcane Harvesting : चंदगडमधील उसाची प्राधान्याने उचल करा

१५ किमी हवाई अंतराच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने उचलणे गरजेचे असताना कर्नाटकातील उसाला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

चंदगड, जि. कोल्हापूर : दौलत-अथर्व, इकोकेन व ओलम शुगर्स यांनी कर्नाटकात असलेल्या आपापल्या ऊसतोड (Sugarcane Harvesting) टोळ्यांपैकी निम्म्या टोळ्या कार्यक्षेत्रात आणाव्यात, चंदगडमधील उसाची प्राधान्याने उचल करावी, अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव यांनी केल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) वतीने आयोजित ऊस आढावा बैठकीत ते बोलत होते. येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार राजेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, तहसीलदार विनोद रणावरे प्रमुख उपस्थित होते.

Sugarcane Harvesting
Sugarcane Farming : वाढती थंडीमुळे उसामध्ये साखर भरण्यास मदत

राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘‘कारखान्यांनी शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. १५ किमी हवाई अंतराच्या कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने उचलणे गरजेचे असताना कर्नाटकातील उसाला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Cultivation : चोपडा तालुक्यात ऊस लागवड घटण्याची चिन्हे

’’ आमदार पाटील म्हणाले, ‘‘कारखान्यांबाबत मी काही वक्तव्य केल्यास त्याचा राजकीय अर्थ लावला जातो. मात्र कर्नाटकातील ऊस जास्त प्रमाणात उचल केला जात आहे आणि स्थानिक ऊस शेतात उभाच आहे हे चित्र स्पष्ट दिसत आहे.’’

डॉ. जाधव यांनी कारखाना प्रतिनिधींकडून ऊसतोडणी टोळ्यांबाबत माहिती घेतली. सर्वच कारखान्यांनी कर्नाटकात जास्त प्रमाणात टोळ्या पाठवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार दौलत अथर्व व ओलम शुगर्सने कर्नाटकात दाखल केलेल्या टोळ्यांपैकी ३० टोळ्या १५ जानेवारीपर्यंत कार्यक्षेत्रात आणाव्यात तर इको केन शुगर्सने ९२ टोळ्या २० जानेवारीपर्यंत आणाव्यात, अशी सूचना केली.

गडहिंग्लज कारखाना बंद असल्याने तेथील उसालाही प्राधान्य द्यावे, असे सांगितले. कारखानदारांनी सूचनांचे पालन न केल्यास पुन्हा आढावा बैठक घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला.

तिन्ही कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सतीश सबनीस, संदीप अर्दाळकर, दीपक अडकूरकर, महादेव गावडे, एम. जे. पाटील, केतन खांडेकर आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com