Sugarcane Harvesting : खानदेशात ऊस तोडणी पूर्णत्वाकडे

यंदा ऊस गाळप हंगाम काहीसा उशिरा सुरू झाला. परंतु बेमोसमी पाऊस किंवा प्रतिकूल वातावरण नव्हते. यामुळे ऊस तोडणी व गाळप वेगात सुरू राहीले.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

Jalgaon Sugarcane Season News : खानदेशात सुमारे १८ लाख टन ऊस गाळप (Sugarcane Crushing) झाले आहे. पुढील काही दिवसातच ऊस गाळप म्हणजेच ऊस तोडणीदेखील (Sugarcane Harvesting ) पूर्ण होईल. यंदा सर्वाधिक गाळप समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील आयान कारखान्याने (Sugar Factory) केले आहे.

त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील घोडसगाव (ता.मुक्ताईनगर) व चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. ऊस गाळप यंदा खानदेशात बऱ्यापैकी झाले आहे. नंदुरबारात तीन आणि जळगावात तीन साखर कारखाने सुरू आहेत.

यंदा ऊस गाळप हंगाम काहीसा उशिरा सुरू झाला. परंतु बेमोसमी पाऊस किंवा प्रतिकूल वातावरण नव्हते. यामुळे ऊस तोडणी व गाळप वेगात सुरू राहीले.

Sugarcane Harvesting
Sugar Cane : ऊस गाळपास गती खानदेशात सहा साखर कारखाने सुरू

सध्या नंदुरबार जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी अपूर्ण आहे. पण ही तोडणीदेखील काही दिवसात पूर्ण होईल. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार हेक्टरवर ऊस पीक होते.

शिवाय मध्य प्रदेशातूनही काही कारखाने ऊस तोडणी करून गाळप करतात. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. जिल्ह्यात तीन कारखाने सुरू राहिल्याने ऊस तोडणी बऱ्यापैकी सुरू होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात लाख टन ऊस गाळप कारखान्यांनी केले आहे.

धुळ्यातील शिरपूर व साक्री भागातून अनुक्रमे जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस तोडणी केली आहे. धुळ्यात एकही कारखाना सुरू नसल्याने जिल्ह्यातील ऊस जळगाव व नंदुरबारात शेतकऱ्यांना पाठवावा लागला.

Sugarcane Harvesting
Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे

खानदेशात यंदा फक्त एकच सहकारी साखर कारखाना सुरू होता. इतर सर्व कारखाने खासगी व्यवस्थापनाकडे आहेत.

डोकारे (ता.नवापूर, जि.नंदुरबार) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना फक्त सहकार क्षेत्रात आहे. इतर सर्व कारखाने खासगी व्यवस्थापनाकडे गेल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com