Raju Shetti : ‘ऊस उत्पादकांनी एकजुट ठेवावी’

या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला. एकजुटीची ही वज्रमूठ अशीच ठेवून आता केंद्र सरकारला हमीभावाचा कायदा करण्यासही भाग पाडू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

कोल्हापूर : या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmer) न्याय मिळाला. एकजुटीची ही वज्रमूठ अशीच ठेवून आता केंद्र सरकारला हमीभावाचा कायदा (MSP Act) करण्यासही भाग पाडू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.

Raju Shetti
Raju Shetty : कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा

स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदणीतर्फे त्यांचा सत्कार व शेतकरी मेळावा घेतला. प्रा. जालंदर पाटील म्हणाले, ‘‘दोन वर्षांपासून राज्यात विक्रमी उसाचे उत्पादन होऊ लागले आहे.

Raju Shetti
Raju Shetty : राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे व वाढलेल्या महागाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडले आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वगळता उर्वरित सर्व पिके घेणारे शेतकरी संकटात सापडला आहे.’’

सावकर मादनाईक, शैलेश आडके, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे, काका भगाटे, युनूस पटेल, तानाजी वठारे, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, रामगोंडा खंजिरे, पापालाल शेख, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com