Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon

Sugarcane Farming : एकरी १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य

उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता, ऊस लागवडीची योग्य पद्धत, माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, ठिबक सिंचनांतून पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सामान्य शेतकऱ्याला सुद्धा सहज शक्य असल्याचे कृषीभूषण डॉ. संजीव माने यांनी केले.

सातारा ः उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी (Record Sugarcane Production) जमिनीची सुपीकता (Soil fertility), ऊस लागवडीची योग्य पद्धत (Sugarcane Cultivation Method), माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या (Fertilizer) योग्य मात्रा, ठिबक सिंचनांतून पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सामान्य शेतकऱ्याला सुद्धा सहज शक्य असल्याचे कृषीभूषण डॉ. संजीव माने यांनी केले.

Sugarcane cultivation
Sugarcane Farming : सातारा जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर ऊस

निसराळे (ता. सातारा) येथील कृषी विभाग आत्मा व कृषी मित्र शेतकरी गट आयोजित एकरी १२५ टन ऊस उत्पादन स्पर्धा अभियान प्रारंभ कार्यक्रमात श्री. माने बोलत होते. या प्रसंगी कोल्हापूर विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ उपस्थित होते. बसवराज बिराजदार यांनी ऊस उत्पादन वाढ अभियान स्पर्धा ही नावीन्यपूर्ण बाब असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेण्याविषयी आवाहन केले.

या ऊस पिक स्पर्धेतून पहिले तीन क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस म्हणून तुषार संच, खत बियाणे टोकण यंत्र, बॅटरीचलित फवारणी पंप, तसेच सहभागी सर्व शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खते देण्याचे रिवुलिस इरिगेशन, साई इंडस्ट्रिज, अग्रिनिर मशनरी, आरसीएफ कंपनीने जाहीर केले आहे. यावेळी मंडळ कृषि अधिकारी युवराज काटे, सरपंच नारायण खामकर, उपसरपंच सुशीला घोरपडे, कृषि पर्यवेक्षक रोहिदास तीटकारे, अनिल यादव, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश नलावडे, नीलम घोरपडे, प्रशांत कुलकर्णी, उमेश जाधव, प्रगतशील शेतकरी श्रीमंत घोरपडे, अंकुश घोरपडे, सचिन घोरपडे, भगवान गायकवाड, श्रीकांत घोरपडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन कृषि सहायक अंकुश सोनावले यांनी केले तर सोसायटी अध्यक्ष राजेंद्रकुमार देशमुख यानी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com