Sugarcane Labour : खेळ कुणाला दैवाचा कळला...

यंदा गाळप लवकर सुरू होणार असल्याने ऊसतोड मजूर कारखान्यांनी आणले खरे, मात्र राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.
Sugarcane Labour : खेळ कुणाला दैवाचा कळला...

नगर, ः‘खेळ कुणाला दैवाचा कळला, मी असो, तू असो, हा असो, कुणी असो, दैवलेख ना कधी कुणा टळला,’ या लेखिका वंदना विटणकर (Vandana Vitanlar) यांनी लिहलेल्या ‘देवता’ चित्रपटातील गीतरचनेचा प्रत्यय राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊसतोड कामगारांना (Sugarcane Laourer) येत आहे.

Sugarcane Labour : खेळ कुणाला दैवाचा कळला...
Sugarcane Labors : नरसिंहपूर परिसरात ऊसतोड मजुरांच्या राहुट्यांत पाणी

यंदा गाळप (Sugarcane Crushing) लवकर सुरू होणार असल्याने ऊसतोड मजूर कारखान्यांनी आणले खरे, मात्र राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. राहुट्यात पाणी शिरून मजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. पावसामुळे ऊसतोडणी बंद आहे. त्यामुळे सोबत आणलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर आहे.

राज्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नगर, विदर्भातील चाळीसगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी भागांतून राज्यातील विविध भागांत साधारण १२ लाखांच्या जवळपास मजूर ऊसतोडणीसाठी दरवर्षी स्थलांतर करतात. गेल्या वर्षी जास्तीचा ऊस होता. यंदाही अधिक ऊस असल्याने राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

Sugarcane Labour : खेळ कुणाला दैवाचा कळला...
Sugarcane Labors : कारखाने सुरू, मात्र ऊसतोडणीला अडथळा

त्यामुळे ‘मजुरांना तातडीने घेऊन या’, असा आदेश मुकादमांना दिला गेला आहे. मुकादमांनी मजुर कारखान्यांवर आणले. आतापर्यंत ४० टक्के मजुरांनी घर सोडले आहे. मात्र जोरदार पावसाने ऊसतोडणी करता येईना. शेतात जागोजागी पाणी साचले आहे. जागा मिळेल तेथे उभारलेल्या राहुट्यात पाणी शिरले आहे. त्यामुळे मजुरांचे हाल सुरू आहेत.

‘राहायची तरी सोय करा’

आव्हाने (ता. शेवगाव, जि. नगर) येथे आलेले मजुर म्हणाले, की ऊसतोडणी बंद असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न आहे. आम्हाला येथे आणले, आता पावसाने ऊसतोडणी करता येईना, आमची राहायची तरी सोय करायला हवी, पण कोणी लक्ष देत नाही.

संकटातील मजुरांकडे कारखान्यांचे दुर्लक्ष

बैलगाडी वाहतूक करणारे कारखाना परिसरात, तर गाडी सेंटर, डोकी सेंटरवर काम करणारे मजूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मिळेल त्या जागी राहुट्या मांडतात. अजून शंभर टक्के मजूर आलेले नसले, तरी ज्या मजुरांनी घर सोडलेय, त्यांना कारखान्यांकडून मदत मिळायला हवी. पाऊस संपेपर्यंत तात्पुरता निवारा, जनावरांना चारा, पावसाने नुकसान झाल्याने गरजेच्या वस्तूंसह गरजेचे साहित्य देण्याची गरज आहे. साखर कारखान्यांकडून संकटातील मजुरांकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com