Summer Sowing : पाच जिल्ह्यांत १९ हजार हेक्‍टरवर उन्हाळी पीक पेरणी

मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची १९ हजार ११९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.
Summer Crop Sowing
Summer Crop SowingAgrowon

Summer Crop Sowing धाराशिव : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची (Summer Crop) १९ हजार ११९ हेक्‍टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. ही पेरणी करताना शेतकऱ्यांनी भुईमुगाला (Groundnut Sowing) सर्वाधिक पसंती दिली असून, त्याची ६ हजार हेक्टरवर, तर उन्हाळी ज्वारीची ३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १२३ टक्के म्हणजे १६ लाख ७९ हजार ३६१ वर रब्बीची पेरणी झाली होती.

मका वगळता रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, करडई आदी पिकांची काढणी सुरू वा अंतिम टप्प्यात आहे. रब्बीनंतर आता शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणीलाही प्राधान्य दिले आहे.

Summer Crop Sowing
Summer Sowing : पुणे विभागात उन्हाळी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात सरासरीच्या २७ टक्के म्हणजे १९ हजार ११९ हेक्‍टरवर उन्हाळी पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरीच्या केवळ पाच टक्के, तर परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के उन्हाळी पेरणी आटोपली आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात सरासरीच्या ४७ टक्के नांदेड जिल्ह्यात ४१ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात १२ टक्के उन्हाळी पेरणी आटोपली आहे.

Summer Crop Sowing
Summer Sowing : सांगलीत एक हजार हेक्टरवर उन्हाळी पीक पेरा

लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली आहे. पाचही जिल्ह्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र २६३२८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६८५२ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या २६ टक्के पेरणी आटोपली आहे.

दुसरीकडे उन्हाळी भाताची १६९ हेक्टरवर, उन्हाळी मक्याची २१८३ हेक्टरवर, उन्हाळी ज्वारीची ३ हजार १३ हेक्टरवर, बाजरीची ६९४ हेक्टरवर, मुगाची ११४ हेक्टरवर, उडीद ४८ हेक्टर, सूर्यफूल २४ हेक्टर, तीळ ६३८ हेक्टर, सोयाबीन ५२८१ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

जिल्हानिहाय उन्हाळी पिकाचे सरासरी व प्रत्यक्ष पेरणी झालेली (क्षेत्र हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष

लातूर २३९६ ११२०

धाराशिव ९५५५ ११३९

नांदेड २२४४१ ९२६४

परभणी १०९५९ ६३७४

हिंगोली २६३४९ १२२२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com