Summer Heat : राज्यात उन्हाचा झळा वाढताहेत

कमाल तापमानात वाढ होत असल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. किमान तापमानातही वाढ झाल्याने गारठा कमी होत आहे.
Summer Heat
Summer Heat Agrowon

Summer Heat पुणे : कमाल तापमानात (Maximum Temperature) वाढ होत असल्याने राज्यात उन्हाच्या झळा (Heat) वाढत आहेत. किमान तापमानातही वाढ झाल्याने गारठा ()Cold Weather कमी होत आहे.

तसेच उकाड्यातही वाढ होऊ लागली आहे. आज (ता. २७) कमाल व किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

सुर्य तळपू लागल्याने विदर्भात उन्हाची ताप अधिक आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.२ अंश तापमानाची नोंद झाली.

Summer Heat
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका

विदर्भातील ब्रह्मपूरी, अमरावती, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे, नांदेड, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

Summer Heat
Weather Update : राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. रविवारी (ता. २६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असून, बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Summer Heat
Weather Update : एल निनोची सध्या भीती नाही...

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१२.१), जळगाव ३६.३ (१२.३), धुळे ३६.०(१३.०), कोल्हापूर - (२०.०), महाबळेश्वर ३१.४ (१७.५), नाशिक ३५.१ (१३.४), निफाड ३५.२(८.२), सांगली ३५.६ (१८.९), सातारा ३५.४ (१६.२), सोलापूर ३७.२ (१८.७),

सांताक्रूझ ३५.५ (१९.६), डहाणू ३१.२ (१७.९), रत्नागिरी ३२.८ (२०.४), छत्रपती संभाजीनगर ३५.४ (१५.०), नांदेड ३६.४ (१६.४), परभणी ३६.३(१५.५), अकोला ३८.२ (१५.४), अमरावती ३७.२(१७.३),

बुलढाणा ३५.५(१९.२), ब्रह्मपूरी ३७.८ (१७.४), चंद्रपूर ३६.६ (१८.८), गडचिरोली ३३.८(१५.६), गोंदिया ३६.२ (१५.८), नागपूर ३५.२ (१६.६), वर्धा ३६.०(१७.१), वाशीम ३६.० (१७.१), यवतमाळ ३५.५ (१७.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com