Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

राज्यातील वादळी पावसाचे वातावरण निवळताच कमाल तापमानासह उन्हाचा चटका वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली.
Heat Wave
Heat WaveAgrowon

Weather Update पुणे : राज्यातील वादळी पावसाचे (Stormy Rain) वातावरण निवळताच कमाल तापमानासह उन्हाचा चटका (Heat) वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाने (Raifall) हजेरी लावली.

आज (ता. १०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा असून, उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तवली आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला होता. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले, तरी उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३३ ते २६ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे.

Heat Wave
Summer Heat : उन्हाच्या चटक्यांनी झळा वाढताहेत

दरम्यान, ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. राज्यात पावसाने उघडीप दिली असल्याने कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारपासून (ता. १३) राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

Heat Wave
Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका कायम

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.२ (१७.५), जळगाव ३६ (१७.५), धुळे ३५ (११.४), कोल्हापूर ३३.२ (२०.५), महाबळेश्‍वर २८.६ (१७.२), नाशिक ३१.७ (१३.४), निफाड ३२ (१०.२), सांगली ३४.५ (१८.५), सातारा ३४.७ (१९.४),

सोलापूर ३६.६ (१९.७), सांताक्रूझ ३५.९ (२१.६), डहाणू ३१.४ (२०.३), रत्नागिरी ३६.३ (२३.२), छत्रपती संभाजीनगर ३२.४ (१६), नांदेड (१८), परभणी ३४.५ (१९.४), अकोला ३५.५ (१६), अमरावती ३५ (१७.७), बुलडाणा ३२.५(१७),

ब्रह्मपुरी ३५.६ (१८.४), चंद्रपूर ३३.२ (-), गडचिरोली ३५.६ (१६.६), गोंदिया ३३.५ (१६.६), नागपूर ३३.९ (१७.४), वर्धा ३५ (१८.४), वाशीम ३५.६ (१७.०), यवतमाळ ३३.२ (१५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com