
Rice Farming In Raygad : जिल्ह्यातील धामणी व कवडास धरणांतील कालव्यातून शेकडो गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. या पाण्यावर या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेती, भाजीपाला यांची लागवड करतात.
तालुक्यातील पूर्वेकडील भागातील शेतकरी वर्ग कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत उन्हाळी वायंगण भातशेती मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
डहाणू तालुक्यातील कासा, वांगर्जे, वाघाडी, चारोटी, सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, नानिवली, ऊर्से, सोनाळे, तवा या भागात सध्या शेतकरी उन्हाळी भातशेतीच्या लागवडीसाठी मग्न आहेत.
कासा, वाणगाव कृषी मंडळांतर्गत ८८०.०९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड केली जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहसाठी मोठा आधार मिळाला आहे.
सूर्या नदीवर जवळपास पाच ठिकाणी कोकण पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने ज्या भागामध्ये कालव्याचे पाणी पोहचत नाही, त्यांना या पाण्याचा उपयोग होतो. या बाबतीत कृषी अधिकारी मार्गदर्शन करत आहेत.
कासा, वाणगाव कृषी मंडळांमध्ये ८८०.०९ हेक्टर क्षेत्रात आज उन्हाळी शेती लागवड केली जात आहे. काही ठिकाणी हरभरा, तूर, भाजीपाला लागवड केली जाते. काही दिवसांपूर्वी कालव्यातून पाणी सोडल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेत नांगरून भात पेरणी केली आहे. काही ठिकाणी नांगरणी सुरू आहे.
अनेक ग्रामीण भागांत गरीब शेतकरी बैलजोडीच्या साह्याने शेतात काम करीत आहेत; तर काही भागांत ट्रॅक्टरचा वापर सुरू आहे. तरीही सध्या जोरदार थंडी पडत असल्याने वातावरणातील बदलामुळे रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत आहे.
पावसाळ्यामध्ये रोगराई तसेच अतिवृष्टी, पूर यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळी शेती लागवडीसाठी शेतकरी उत्सुक आहेत. येथील कालव्याशेजारील हजारो शेतकरी उन्हाळी शेती करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.