Summer Sowing : लातूर विभागात पाच जिल्ह्यांतील उन्हाळी पेरणी ३० हजार हेक्टरवर

विभागातील पाचही जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३० हजार ०१५ हेक्टर म्हणजे सरासरीच्या ४२ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
Summer Crop Sowing
Summer Crop SowingAgrowon

Latur News : विभागातील पाचही जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे (Summer Sowing Season) सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३० हजार ०१५ हेक्टर म्हणजे सरासरीच्या ४२ टक्के क्षेत्रावर पेरणी (Sowing) झालेली आहे. उन्हाळी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत.

पीकनिहाय उन्हाळी पिकांची स्थिती

उन्हाळी सोयाबीन : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १५६ हेक्टर असून आत्तापर्यंत ९ हजार ७२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ६० टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी भुईमूग ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६३८८ हेक्टर असून आत्तापर्यंत १०७६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ४१ टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी मका ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ०५७ हेक्टर असून आत्तापर्यंत ३०२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ३८ टक्के) आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे.

Summer Crop Sowing
Summer Crop Sowing : पाच जिल्ह्यांत २९ हजार एकरांवर उन्हाळी पीक

रब्बी पीक परिस्थिती

लातूर विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात १६ लाख ७१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. रब्बीतील गहू हरभरा करडई या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे.

पीकनिहाय रब्बी पीक स्थिती

रब्बी ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर होते. प्रत्यक्षात २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. रब्बी ज्वारी पिकाची सध्या काढणी सुरु असून ६५ ते ७० टक्के काढणी पुर्ण झाली आहे.

Summer Crop Sowing
Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात

गहू ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर होते. प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची काढणी सुरु असून ८५ ते ९० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून प्रत्यक्षात ११ लाख ५९ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १४८ टक्के आहे. पीक सद्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकाची सध्या काढणी सुरु असून ९० ते ९५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

रब्बी मका ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर असून १७७६४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे. पीक सद्या कणसे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

जिल्हा न्याय सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

लातूर २३९६ १६४४ ६९

उस्मानाबाद ९५५५ २८९२ ३०

नांदेड २२४४१ ९२६४ ४१

परभणी १०९५९ ६५१२ ५९

हिंगोली २६३४९ ९७०३ ३७

विभाग ७१७०० ३००१५ ४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com