
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : तेलबिया (Oilseed Crop) म्हणून ओळख असलेल्या सूर्यफूल पिकाकडे (Sunflower Crop) पुणे विभागातील शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
यंदा रब्बी हंगामात सूर्यफूल पिकाची (Sunflower Crop) सरासरीच्या एक हजार २८२ हेक्टरपैकी अवघी ५२५ हेक्टर म्हणजेच सरासरी ४१ टक्के पेरणी झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास ७५७ हेक्टरने घट झाली आहे.
गेल्या वर्षी सूर्यफुलाची ४४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७९ हेक्टरने वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ११८ टक्केने वाढ झाली आहे. सध्या पिकांची अवस्था चांगली असली आहे.
अनेक ठिकाणी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत या पिकांची पूर्ण काढणी होईल, अशी शक्यता आहे. यंदा थंडी असल्याने पिके जोमदार आली होती.
प्रामुख्याने सूर्यफुलाची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांत अनेक शेतकरी पेरणी करतात. आता रब्बी हंगामातील काढणी वेगात सुरू आहे.
त्यातच अधूनमधून बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात रोग, किडीचाही पिकांवर प्रादुर्भाव झाला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक पेरणी ही एकट्या बारामती तालुक्यात झाली आहे.
या तालुक्यात सरासरीच्या ३४ हेक्टरपैकी २२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर हवेली, इंदापूर, दौड तालुक्यांतही तुरळक ठिकाणी पेरणी झाली होती. नगर जिल्ह्यातही नगर, कर्जत या तालुक्यांत तुरळक ठिकाणी पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सूर्यफुलाची पेरणी झाली नव्हती. यंदा थोड्याफार प्रमाणात पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही सूर्यफुलाविषयी महत्त्व वाढत आहे.
त्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत बऱ्यापैकी सूर्यफुलाची पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ३६१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सर्वाधिक पेरणी ही माढा तालुक्यात झाली असून, सुमारे ९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सूर्यफूल पिकांची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये) जिल्हा -- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्केवारी नगर -- ३१ -- ७ -- २२ पुणे -- ६६ -- २५१ -- ३८० सोलापूर -- ११८५ -- २६८ -- २३ एकूण -- १२८२ --५२५ -- ४१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.