परभणीत अडतीस हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा

आजवर सार्वजनिक क्षेत्रातील बीजोत्पादकांनी १ हजार ४०६ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांनी ३६ हजार ९१० असा दोन्ही मिळून एकूण ३८ हजार ३१६ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला आहे.
परभणीत अडतीस हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा
Soybean SeedsAgrowon

परभणीः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मंगळवार (ता. ७) पर्यंत बियाणे उत्पादकांनी विविध पिकांच्या ३८ हजार ३१६ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला आहे. त्यापैकी १२ हजार ६१० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. कपाशीच्या ६ लाख ५२ हजार ३०० बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला. त्यापैकी ५३ हजार पाकिटांची विक्री झाली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे विविध पिकांच्या ३३ हजार ४१७ क्विंटल बियाण्याची आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ३१ हजार ८२१ क्विंटल बियाण्याची मागणी केलेली आहे.

आजवर सार्वजनिक क्षेत्रातील बीजोत्पादकांनी १ हजार ४०६ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांनी ३६ हजार ९१० असा दोन्ही मिळून एकूण ३८ हजार ३१६ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला आहे. खासगी कंपन्यांच्या सोयाबीनच्या १२ हजार ३०० क्विंटल, तुरीच्या ४८ क्विंटल, मुगाच्या ८ क्विंटल, उडदाच्या ३ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

महाबीजकडून कमी बियाणे पुरवठा...

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (२०२२) महाबीजकडे सोयाबीनच्या ३० हजार क्विंटल बियाण्यासह विविध पिकांच्या ३३ हजार ४१७ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाने केली होती. परंतु आजवर महाबीजकडून सोयाबीनच्या १ हजार १६२ क्विंटल बियाण्यासह अन्य पिकांच्या मिळून एकूण १ हजार ४०८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.

कपाशी बियाण्याच्या साडेसहा लाख पाकिटांचा पुरवठा...

यंदा कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यात महाबीजकडे ५ हजार बियाणे पाकिटे आणि खासगी कंपन्याकडे १० लाख ६७ हजार ५०० बियाणे पाकिटांचा समावेश आहे.आजवर खासगी कंपन्यांनी ६ लाख ५२ हजार ३०० पाकिटांचा पुरवठा केला आहे.आजवर ५३ हजार पाकिटांची विक्री झाली.शेतकऱ्यांकडून विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाण्याची मागणी केली जात आहे. किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्रीचे प्रकार सुरू आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com