Mantralay : मंत्रालय प्रवेशावर आमदारांच्या समर्थकांनाही निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात आमदार आणि त्यांच्या समर्थकांमुळे मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.
Mantralay
MantralayAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात आमदार आणि त्यांच्या समर्थकांमुळे मंत्रालय (Mantralay) सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मात्र यापुढे केवळ दोनच समर्थकांना सोबत नेता येईल. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी निर्देश दिले आहेत.

Mantralay
Cotton Market : ‘सीसीआय’ला कापूस खरेदीला मुहूर्त नाही

दरम्यान, निर्देश दिलेल्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. ३) शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रालयात शिंदे गटाच्या आमदारांचा राबता वाढला आहे. आपल्यासमोर समर्थकांचा जत्थाच घेऊन येणारे आमदार मंत्र्यांच्या दालनांचा ताबा घेतात. अनेकदा मुख्यमंत्री कार्यालयातही बैठकांना अधिकाऱ्यांना बसण्यास जागा नसते, अशी परिस्थिती असते. समर्थकच खुर्च्यांचा ताबा घेत असल्याने करायचे काय, असा सवाल अधिकाऱ्यांनी केला. मंत्रालयात महत्त्वाच्या बैठका सुरू असताना मंत्र्यांच्या दालनात आमदार थेट जात होते. यात शिंदे गटाचे आमदार आघाडीवर आहेत.

Mantralay
Soybeans Market : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका पोलिस कर्मचाऱ्याने आमदार संतोष बांगर यांच्यासोबत आलेल्या १५ ते २० समर्थकांना सोडण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या बांगर यांनी संबंधित कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. तसेच कोण अडवतो पाहतो, असे म्हणत सर्वांना मंत्रालयात नेले. या घटनेमुळे गुरुवारी काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेचा अहवाल पोलिसांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविला आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली, त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com