Maharashtra Crisis:सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिकेवर आज ५ वाजता सुनावणी

सिंघवी यांची तात्काळ सुनावणीची मागणी खंडपीठाने मान्य केली. या आव्हान याचिकेशी सहमत असू वा नसू मात्र त्यावरील तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी आम्ही मान्य करत असल्याचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी सांगितले.
Supreme Court
Supreme Court Agrowon

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला उद्या (३० जून) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. शिवसेनेने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज सांयकाळी ५ वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारने बहुमत गमावले असून राज्यपालांनी सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Supreme Court
Maharashtra Politics:महाविकास सरकारची उद्या अग्निपरीक्षा: बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे आदेश

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी राज्यपालांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रभू यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला आणि सूर्य कांत यांच्या खंडपीठाकडे या याचिकेवरील तात्काळ सुनावणीची मागणी केली.

सिंघवी यांची तात्काळ सुनावणीची मागणी खंडपीठाने मान्य केली. या आव्हान याचिकेशी सहमत असू वा नसू मात्र त्यावरील तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी आम्ही मान्य करत असल्याचे न्यायमूर्ती सूर्य कांत (Justice Surya Kant) यांनी सांगितले. यासाठी सायंकाळी ५ वाजताचा वेळ निश्चित करण्यात आली.

Supreme Court
शिंदे आणि समर्थकांना परत बोलवा: उच्च न्यायालयात याचिका दाखल

विश्वासदर्शक ठरावाचे (Floor test) आदेश आज सकाळी देण्यात आले आहेत. यात आमदारांवरील अपात्रतेच्या आदेशाचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे फ्लोर टेस्टचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सिंघवी यांनी खंडपीठाला सांगितले. आपण या विषयाची तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती करत असल्याचे सिंघवी म्हणाले. खंडपीठाने यासंदर्भातील याचिकेची प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रे दुपारी ३ वाजेपर्यंत तयार ठेवण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले.

सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे आमदारांवरील अपात्रतेचा ठराव प्रलंबित असण्याशी याचा संबंध नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांचे वकील एन. के. कौल यांनी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या मागणीस विरोध दर्शवला.

Supreme Court
शेतकऱ्यांसाठी मॉन्सून आणि सरकारही नॉट रिचेबल

दरम्यान २७ जून रोजी ज्येष्ठ वकील देवदत्त कामत (Devdatt Kamat) यांनी ११ जुलैपर्यंत विश्वासदर्शक ठरावाची मागणी मान्य करण्यात येऊ नये. न्यायालयाने 'जैसे थे' आदेश द्यावेत, अशी तोंडी मागणी खंडपीठाकडे केली होती. त्यावर खंडपीठाने विश्वासदर्शक ठरावावयाबाबत काहीही भाष्य केले नव्हते. मात्र अशी काही वेळ आल्यास तुम्हाला न्यायालयात दाद मागता येईल, असा निर्वाळा दिला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com