Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्ग नुकसानग्रस्तांना बैठकीची प्रतीक्षा

Compensation To Farmer : वाढीव मोबदल्यासाठी तिष्ठताहेत शेतकरी; पुन्हा आंदोलनाचा इशारा
Surat-Chennai Highway
Surat-Chennai HighwayAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर, संबंधितांसोबत चर्चेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुंबईत बैठक बोलावली होती.

मात्र, कर्नाटक निवडणुकीमुळे ही बैठक झाली नाही. बाधित शेतकरी सध्या बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत.

हा प्रश्न लवकर न मिटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत सोलापूर येथील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देऊनच सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

याबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसह मुंबईत बैठक घेण्याचे ठरले होते.

Surat-Chennai Highway
Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रश्‍नावर मंगळवारी मुंबईत बैठक

मात्र, सध्या नुकतीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली आहे. यानंतर शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री बैठक घेणार होते.

मात्र, तीन महिने झाले तरही बैठक होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढीव मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ताबडतोब बैठक घेऊन वाढीव मोबदल्याचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांमधून होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com