Natural Farming : नैसर्गिक शेतीचे ‘सूरत मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरेल ः मोदी

प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरतचे मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Natural Farming : नैसर्गिक शेतीचे ‘सूरत मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरेल ः मोदी

नवी दिल्ली ः प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी (Natural Farming) जोडण्याचे सूरतचे मॉडेल (Surat Model Of Natural Farming) संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.

गुजरातमध्ये सूरत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो शेतकरी आणि सूरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक सहभागी झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपालदेखील या परिसंवादात सहभागी झाले होते.

Natural Farming : नैसर्गिक शेतीचे ‘सूरत मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरेल ः मोदी
शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज

पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने देश अनेक लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. येणाऱ्या काळात त्यामुळे खूप मोठे परिवर्तन घडून येईल. देशाच्या प्रगतीचा पाया आणि वेग यामागे ‘सबका प्रयास’ची भावना आहे आणि आपल्या विकासाच्या यात्रेचे ती नेतृत्व करत आहे. म्हणूनच गरिबांच्या आणि वंचितांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायतींना महत्त्वाची भूमिका सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पंचायतीमधून ७५ शेतकऱ्यांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण आणि इतर संसाधनांची मदत करत ठोस भूमिका बजावली.

त्यामुळे ५५० पंचायतींमधील ४० हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले आहेत, असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ही एक उत्तम सुरुवात असून अतिशय उत्साहवर्धक आहे. नैसर्गिक शेतीचे हे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते. आमच्या गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात. नैसर्गिक शेतीबाबतचे जनआंदोलन येत्या काळातही मोठे यश मिळवेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com