Suresh Prabhu: भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी सुरेश प्रभू?

अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आपण विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली, असे प्रभू यांनी ट्विटमध्ये म्हटले. या विविध विषयांत उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समाविष्ट होता का, हे कळू शकलेलं नाही.
Suresh Prabhu
Suresh PrabhuAgrowon

वृत्तसंस्थाः माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना भाजपकडून (BJP) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. सुरेश प्रभू यांनी नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन चर्चा केली. स्वतः प्रभू यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला. आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आपण विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली, असे प्रभू यांनी ट्विटमध्ये म्हटले. या विविध विषयांत उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समाविष्ट होता का, हे कळू शकलेलं नाही. मात्र या भेटीनंतर भाजपकडून सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.

महाराष्ट्रात सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष ऐन रंगात आलेला असताना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांचे नाव चर्चेत आले आहे. प्रभू हे मूळचे शिवसेनेचे नेते आहेत. सुरेश प्रभू यांनी १९९६ मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या (Shivsena) तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली. १९९८, १९९९ या सालच्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री होते.

Suresh Prabhu
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊन शकत नाही : ठाकरे

२००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. मात्र भाजपने प्रभू यांना २०१४ साली राज्यसभेवर संधी दिली. त्यांना केंद्रात मंत्रीपदही दिले. प्रभू यांनी वाणिज्य, रेल्वे , नागरी उड्डाण अशा महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com