साकळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण करा; कडू

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी साकळाई योजनेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बाबत पुढील आठवड्यात आदेश निघणार आहे.
साकळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण करा; कडू
WaterAgrowon

नगर : अनेक वर्षांपूर्वी मान्यता मिळालेल्या नगर, श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई प्रकल्पासाठी आता पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वेक्षण करण्यास काय हरकत आहे, असा सवाल करीत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी साकळाई योजनेचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बाबत पुढील आठवड्यात आदेश निघणार आहे. नगर, श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी साकळाई पाणी योजनेचा विषय मार्गी लागण्याची आस निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात नियोजित दौऱ्यातून वेळ काढून श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे मंत्री बच्चू कडू यांच्यापुढे नागरिकांनी साकळाईचा प्रश्न मांडत तो सोडविण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी कडू यांनी विषय समजून घेत शुक्रवारी (ता. ३) मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बैठकीत साकळाईसोबतच राज्यातील उपसा सिंचन योजनांची चर्चा झाली. मंत्री कडू साकळाईबाबत आग्रही होते. तसेच आंबेगाव, पारनेर व कर्जतमधील पाच ते सहा योजना करण्याची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्यांसाठी १२ टीएमसी पाणी कुकडीतून लागेल. सध्या त्यासाठी साडेआठ टीएमसी पाणी उपलब्ध आहे, असे ते म्हणाले. त्यावर उपस्थित अभ्यासकांनी, १९६६ मध्ये पहिल्यांदा साकळाईला मंजुरी मिळाली. त्यानंतर १९९४ मध्येही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता इतर योजनांचा विषय घेतानाच सर्वप्रथम साकळाईचा विषय मार्गी लागण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत मांडले.

अधिकाऱ्यांनी पाणी उपलब्ध झाल्यावर साकळाईचे सर्वेक्षण करावे, असा मागील संदर्भ दिला. त्यावर मंत्री कडू यांनी सांगितले की, पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे साकळाईचे सर्वेक्षण थांबू नये. त्यासाठी लगेच कार्यवाही सुरू करावी. श्रीगोंदे व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तो महत्त्वाचा विषय आहे. तो मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com