Crop Damage Survey : पुणे जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार

गेल्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव आदी तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव आदी तालुक्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain Pune District) झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे (Agriculture Damage Due To Heavy Rain) नुकसान झाले. त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) तातडीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘जणू आभाळ फाटलं, अतिवृष्टीने ना पिके वाचली ना शेती’

पुणे, सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे पुरंदर, दौंड, बारामती परिसरातील अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. त्याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन नागरिकांना आवश्यक ती मदत करावी. तसेच शेती व घरांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी केली होती.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे ९ हजार ८२२ हेक्टरवर पिकांची धूळधाण

मुख्यमंत्री ‘ॲक्शन मोड’वर

राज्यस्तरावरील मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली. या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com