Abdul Sattar : पंचनाम्यासाठी पैसे मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे निलंबन

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या पथकाद्वारे केले जात आहेत.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्याकडून पंचनाम्यासाठी (Crop Damage Survey) पैशांची मागणी (Money Demand For Survey) केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी सहायक रोहणी मोरे यांचे निलंबन (Rohini More Suspension) करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पत्रकारांनी बोलताना दिली आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar : कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे वाण बनवा

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या पथकाद्वारे केले जात आहेत. मात्र पंचनामे करण्यासाठी एकरी ४०० रुपयांची मागणी केल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चिलखेनवाडी येथे घडला होता. महसूल विभागाच्या पथकाने पंचनाम्यासाठी एकरी ४०० रुपयांची मागणी केली होती. मात्र शेतकऱ्यांने त्यांची चित्रफीत करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

Abdul Sattar
Abdul Sattar : शेतकरी, मजुरांच्या प्रश्‍नांवर निर्णायक भूमिका घेण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी

त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी या प्रकाराबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावर बुधवारपर्यंत घडल्या प्रकाराची चौकशी करू आणि दोषीवर कारवाई करू अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली होती. मात्र अवघ्या अडीच तासात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकरणातील दोषी असलेल्या कृषी सहायक रोहिणी मोर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.

या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहेत, त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची हयगय करण्यात येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांकडे महसूल विभागाचे पथक ४०० रुपयांची मागणी करताना दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आधीच अतिवृष्टीने पुरता कोलमडलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com